वाशी गावचे जेष्ठ समाजसेवक वतनदार मारुती हरी लहाने यांचे निधन

खारी रोहा-केशव म्हस्के     

 रोहा तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत वाशी येथील रहिवासी तथा तळाघर - बोरघर विभाग विविध विकास सोसायटीचे विद्यमान चेअरमन जेष्ठ समाजसेवक वतनदार श्री.मारुती हरी लहाने साहेब यांचे रविवार दिनांक १६ जानेवारी २०२२ रोजी वयाच्या ८२ व्या वर्षी वयोमानपरत्वे अल्पशा आजाराने राहत्या घरी दुःखद निधन झाले. तरुणांना आदर्शवत, कर्तृत्ववान,पितृतुल्य नेतृत्व हरपले. 

मारुती लहाने एक आधारवड 

रायगड जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष तथा अर्थ व बांधकाम सभापती मनोहर विष्णू पाशिलकर उर्फ भाईसाहेब पाशिलकर यांचे अत्यंत निकटचे निष्ठावंत व विश्वासू सहकारी होते.  पुढे त्यांच्याच पुढाकाराने, मार्गदर्शनाने व सहकार्याने तालुक्यातील राजकीय दृष्ट्या नावाजलेल्या ग्रुप ग्राम पंचायत वाशी चे सलग पंधरा वर्षे  बिनविरोध माजी उपसरपंच पद भूषविलेले मारुती लहाने यांचा ग्रामपंचायत हद्दीतील विविध सामाजिक विकास कामे मोठ्या प्रमाणावर मार्गी लावण्यात सिंहाचा वाटा होता,तसेच किल्ला-धाटाव ग्रुप कुणबी समाजाचे माजी अध्यक्ष तथा कृषिनिष्ठ शेतकरी तळाघर - बोरघर - लांढर  विविध विकास सोसायटीचे विद्यमान चेअरमन असल्याने रायगड जिल्हा बँकेच्या (RDC- Bank) मदतीने बारसोली-धाटाव-तळाघर-मळखंडवाडी- महादेववाडी - बोरघर - वाशी आदी ठिकाणच्या  गोरगरीब गरजू शेतकऱ्यांना सोसायटीच्या  माध्यमातून  निस्वार्थी भावनेने सर्वाधिक शेतकऱ्यांना बिनव्याजी आर्थिक सहाय्य पतपुरवठा करून शेतीच्या कामासाठी निधी उपलब्ध करणे व दरवर्षी त्याची वसुली करणे तसेच शासनाच्या विविध योजनांचा लाभ शेतकरी वर्गास सदैव सकारात्मक सहकार्य सहाय्यभूत व मोलाचे योगदान देण्यात अग्रगण्य असलेले अनेकांना विनामूल्य व तत्पर सेवा देणारे  तरुणांना प्रेरणादायी व आदर्शवत कर्तृत्ववान वतनदार पितृतुल्य नेतृत्व हरपलयाने संपूर्ण किल्ला - धाटाव - वाशी - तळाघर - बोरघर दशक्रोशीत दुःखाचा डोंगर कोसळला असून सर्वत्र हळहळ व्यक्त होताना दिसत आहे.एका जेष्ठ पितृतुल्य समाजसेवकाला पंचक्रोशी पोरकी झाली असून त्यांच्या जाण्याने मोठी पोकळी निर्माण झाली आहे.त्यांच्या हसतमुख,प्रेमळ,दयाळू,मनमिळावू व परोपकारी साध्या सरळ स्वभावामुळे प्रत्येक क्षेत्रामध्ये लहानांपासून थोरांपर्यंत  कौटुंबिक व जिव्हाळ्याचे नाते जपले असे भावपुर्ण उद्गगार श्रध्दांजली अर्पण करताना कुणबी समाज नेते सुरेश मगर व  कृष्णा बामणे यांनी व्यक्त केले.

    त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे,एक मुलगी, सूना, जावई ,नातवंडे,पतवांडे,सगे - सोयरे,नातेवाईक असा मोठा परिवार आहे.

  त्यांचे दशक्रिया विधी मंगळवार दि. २५ जानेवारी रोजी तळाघर येथील महादेव मंदिर येथे होतील तर अंतिम धार्मिक विधी बारावे उत्तर कार्य गुरुवार दि. २७ जानेवारी रोजी राहत्या घरी होतील याप्रसंगी रायगड भूषण गुरुवर्य हभप.बाळाराम महाराज शेळके यांची सकाळी १०:०० ते १२:०० या दरम्यान प्रवचन सेवा होईल.

     त्यांच्या निधनाची वार्ता समजताच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष रोहा तालुका अध्यक्ष विनोद पाशिलकर,धाटाव विभाग माजी अध्यक्ष तथा जेष्ठ कुणबी समाज नेते रायगड जिल्हा सरचिटणीस सुरेश मगर,रोहा तालुका कुणबी समाज उपाध्यक्ष शंकर भगत, रोहा पंचायत समितीचे माजी सभापती लक्ष्मण महाले,माजी उपसभापती अनिल भगत,वाशी ग्राम पंचायत माजी सरपंच सतीश भगत,वाशी ग्रूप ग्राम पंचायत विद्यमान उपसरपंच अरविंद मगर,प्रसिद्ध कलिंगड व्यावसायिक यशस्वी शेतकरी अनंत मगर,विष्णू लोखंडे,तालुक्यासह किल्ला - धाटाव विभागातील आजी - माजी सरपंच,ग्राम पंचायत सदस्य, राजकीय,सामाजिक,शैक्षणिक,औद्योगिक आदी विविध क्षेत्रातील प्रतिष्ठित मान्यवर मंडळी ,कुणबी समाज बांधव,नातेवाईक सगे - सोयरे यांनी त्यांच्या अंत्यविधी प्रसंगी दर्शन घेत लहाने परिवाराचे सांत्वन केले.

           

Comments

Popular posts from this blog