रोहा तालुका महिला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे आंबेवाडी व रोठखुर्द येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहाने साजरी
रोहा-प्रतिनिधी
आद्य स्त्रीशिक्षिका,सामाजिक क्रांतीच्या अग्रणी,क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची 131 वी जयंती,रोहा तालुका महिला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने साजरी करण्यात आली.आंबेवाडी आणि ग्रामपंचायत रोठखुर्द या ठिकाणी हा कार्यक्रम संपन्न झाला.
बालिका दिनाचे औचित्य साधून यावेळी शिक्षणक्षेत्रात व कोरोना काळात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी रोहा तालुक्यातील क्रियाशील महिला तालुका अध्यक्षा सौ.प्रितमताई पाटील यांच्या समवेत रोठखुर्द सरपंच गीताताई मोरे, उपसरपंच सुनिता मोरे,ज्योती डाके,सर्व ग्रामपंचायत सदस्य,स्नेहा ताडकर,समीक्षा घावटे,सुरेखा पार्टे,शितल बंगाल,रोशनी बेर्डे, अपर्णा कोंडे, प्रणाली सानप, तसेच सर्व शिक्षक वर्ग, अंगणवाडी सेविका,मदतनीस व सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Comments
Post a Comment