श्री.दत्तात्रेय चंदर चव्हाण तथा डि.सी.काका यांची ग्रुप ग्रामपंचायत नवघर उपसरपंचपदी बिनविरोध निवड
पाली-प्रतिनिधी
सुधागड तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे निष्ठावंत जेष्ठ कार्यकर्ते आणि ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य श्री. दत्तात्रेय चंदर चव्हाण तथा डि.सी.काका यांची ग्रुप ग्रामपंचायत नवघर उपसरपंचपदी बिनविरोध निवड करण्यात आली.यावेळी सुधागड तालुक्याचे सभापती रमेश सुतार, नवघर ग्रामपंचायत सरपंच स्वाती कदम, ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य ,संजय कदम,शशिकांत लांगी,राजेश मांगले,नारायण सुतार, एकनाथ जेधे,गंगाराम सुतार,मोरेश्वर चव्हाण,यशवंत काजारे,विवेक रोकडे,रवींद्र जाधव, दिपक सुतार,सचिन खोले, अरुण साळवी,प्रभाकर पोरे लक्ष्मण सुतार ,नारायण जाधव,बळीराम मांगळे,दगडु साळवी,मोरेश्वर दळवी,सौ.दर्शना सतेरे,रोशनी चव्हाण आणि नवघर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दरम्यान श्री.दत्तात्रेय चंदर चव्हाण तथा डि.सी.काका यांच्या ग्रामपंचायत नवघर उपसरपंचपदी निवडीमुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे.
Comments
Post a Comment