गोवे महिला बचत गटांनी तयार केलेल्या मसाल्याची चव महाराष्ट्राने चाखावी - खासदार सुनिल तटकरे 

रोहा-शरद जाधव

      गोवे ग्रामपंचायतीसह आजुबाजुच्या परिसरातील बुजुर्ग नेते मंडळींनी हा परिसर घडवीला त्याच पध्दतीने तरुणवर्गही लक्ष घालीत आहे. गोवे गाव एकसंघ झाला, कटुता संपली ,याचा मनस्वी आनंद माझा सारख्या कार्यकर्त्यांला असुन या गावातील जिजाऊ महिला बचत गटानी विविध प्रकारच्या मसाल्याचा उद्योग सुरु केला आहे. त्यामुळे माझ्या माता-भगिनीनी तयार केलेल्या या मसाल्याची चव महाराष्ट्राने चाखावी ईतकी भरभराट उद्योगाची व्हावी, असे वक्तव्य खासदार सुनिल तटकरे यांनी केले.

गोवे येथील ग्रामपंचायत इमारतीचे उध्दघाटन ,नळपाणी पुरवठा योजनेचे भूमिपूजन इ. विकास कामांच्या उध्दघाटन प्रसंगी ते बोलत होते.

व्यासपिठावर आमदार अनिकेतभाई तटकरे, सुरेश दादा महाबळे ,रामचंद्र चितळकर ,महेंद्र पोटफोडे  बाबूराव बामणे,नारायण धनवी, तानाजी जाधव,प्रकाश थिटे, राम कापसे, नंदा कापसे, प्रितम पाटील, नरेंद्र जाधव, वसंत भोईर, संजय माड़लुस्कर ,प्रशांत म्हशीलकर ,प्रमोद म्हसकर, मनोज शिर्के, दशरथ साळवी, उपसरपंच उत्तम बाईत आदी कार्यकर्ते उपस्थित होते .

    ज्या महामानवानी समाजाला दिशा दिली, विचार दिले तेच विचार शरदचंद्र्जी पवार साहेब जपत आहेत. गोवे गावात देखील महामानवाचा वारसा जपला जात आहे.अनेक ठिकाणी नव्या क्रांति नुसार एकिकडे मोठ मोठी जिमन्याशियम उभी रहात असताना या ठिकाणी तरुण मुलांचा आखाडा,लेझिम- कवायती पाहिल्या तर जुन्या संस्कृतीचा ठेवा जपण्याचे काम सुंदरपणे होत आहे.

  काल परवा आमदार या परिसरात आले 500 कोटींची कामे केली. एवढा मोठा आकडा ,काम कुठे केली त्यांनाच माहिती.परत ते असे बोलले एका घरात पाच आमदार ,एक खासदार, परंतु ही आमदार खासदार किची पुण्याई जनतेची काम केल्यानेच.जनतेने निवडून दिले. केवळ एकदा निवडुन आल्यावर 15 वर्ष तुम्हाला वाट बघावी लागते असा अप्रत्यक्ष टोला आमदार रवि पाटील यांना लगावला.

गोवे ग्रामपंचायतीचे उद्याचे भविष्य उज्वल असुन या पंचक्रोशीला कुणाचीही दृष्ट न लागो असे म्हणत महिलांना रोजगार मिळावा, त्यांनी  आपल्या पायावर उभे रहावे या करिता आंबेवाडी येथे बचत गट भवनाची उभारणी करणार असल्याचे तटकरे यांनी सांगितले. 

      आमच्यावर विश्वास ठेउन ग्रामपंचायत बिनविरोध केलीत, तुमची सगळी विकासाची कामे केली जातील, असा ठाम विश्वास आमदार अनिकेत तटकरे यांनी ग्रामस्थांना दिला.

मुठवली,शिरवली गोवे या तिन्ही गावात पाणी योजना रुपये 1 कोटी, शिरवली गोवा रोड, रुपये 4 कोटी 65 लाख महिसदरा बंधिस्ती 1 कोटी अशी कामे मार्गी लागणार असुन अनेक डझनभर कामे झाली असल्याची यादी सरपंच महेंद्र पोटफोडे यांनी वाचुन दाखवली व तुम्ही करित असलेल्या विकासाबाबत साहेब ,ताई,भाई यांना धन्यवाद दिले. 

कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता सरपंच महेंद्र पोटफोडे,नरेंद्र जाधव, उपसरपंच नितीन जाधव, सदस्या सुप्रिया जाधव, रंजिता जाधव ,भावना जवके, भरत कापसे, संदीप जाधव, नरेंद्र पवार, राजा जाधव, नितीन जवके, महेंद्र जाधव सह ग्रामस्थ मंडळ, महिला मडंळ, तरुण मंडळ व बचत गटाच्या महिलांनी अथक मेहनत घेतली .

               (मसाला पाकिटे भेट) 

साहेबांना जिजाऊ बचत गटाकडून मसाल्याची पाकिटे भेट देण्यात आली. यावेळी  महिलांनी विनंती केली .

साहेब,वरदातांईकडे ही पाकिटे नक्की पाठवा आणि तुम्ही रुचकर भोजनाचा आस्वाद घ्या. 

यावर साहेब उत्तर देताना म्हणाले की,मागील अनेक वर्षे  जी जबाबदारी मी घेतली नाही, ती अवघड जबाबदारी माझ्याकडे  आपण सोपवलीत असे सांगताच सभेतील लोकांना हसु आवरेनासे झाले.

Comments

Popular posts from this blog