रायगड जिल्हा भोई समाजाच्यावतीने डॉ.प्रेमळ मुसळे हिचा सत्कार.



   कोलाड-श्याम लोखंडे 

 रोहा तालुक्यातील गोवे गावची सुकन्या डॉ. प्रेमळ सुरेश मुसळे हिने (बी.ए.एम.एस./मुंबई) ही पदवी घेऊन डॉक्टर झाल्यामुळे तिचा रायगड जिल्हा भोई समाजातर्फे सन्मान करण्यात आला.



           रायगड जिल्हा भोई समाज सेवा संस्थेची ६२ वी वार्षिक परिषद व १७ वी वार्षिक अहवाल सभा शनिवार दि.८ जानेवारी २०२२ रोजी रोहा तालुक्यातील म्हसकरवाडी येथे संपन्न झाली.या कार्यक्रमाचे अध्यक्ष रत्नाकर मधुकर कनोजे  सर व कार्यक्रमाचे उद्धघाटक खा.सुनिलजी तटकरे हे होते.या कार्यक्रमात गोवे गावची सुकन्या व सध्या ठाणे येथे राहणारी कु. प्रेमळ सुरेश मुसळे ही बी.ए.एम.एस.(मुंबई)ही पदवी घेऊन डॉक्टर झाल्यामुळे म्हसकरवाडी येथील कार्यक्रमात सन्मान करण्यात आला.

                          या कार्यक्रमाचे उद्धघाटक खासदार सुनिलजी तटकरे यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना सांगितले कि, भोई समाज सेवा संस्था या समाजाचे कार्य दिवसेंदिवस प्रगती पथावर जात असून या समाजातील विद्यार्थी उच्च शिक्षण घेत आहेत व आम्ही ही कोठे कमी नाही हे एका खेडेगावातील मुलगी प्रेमळ सुरेश मुसळे डॉक्टर होऊन हे सिद्ध केले आहे.तिच्या या जिद्दीचे कौतुक करावे हे थोडे आहे.यावेळी कोलाड परिसरातील राष्ट्रवादी पक्षाचे सरपंच,उपसरपंच,सदस्य युवा कार्यकर्ते तसेच भोई समाजाचे सर्व पदाधिकारी, सदस्य व रायगड जिल्ह्यातील असंख्य भोई समाज बांधव उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog