ग्रुप ग्रामपंचायत सानेगांव-यशवंतखारच्या वतीने डिजिटल शाळा,व्यायामशाळा साहित्य इ.विकासकामांची पुर्तता

रोहा-प्रतिनिधी

रायगडचे खासदार सुनिल तटकरे, पालकमंत्री आदिती तटकरे व आमदार अनिकेतभाई तटकरे यांच्या मार्गदर्शनानुसार ग्रामपंचायत सानेगाव-यशवंतखार मध्ये विकासकामांचा धडाका सुरु आहे. ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ.स्वप्नाली संतोष भोईर यांचे नेतृत्वाखाली व सर्व ग्रामपंचायत सदस्यांच्या सहयोगातून ग्रामपंचायत क्षेत्रात अमुलाग्र बदल झालेला दिसत आहे.

आधुनिक युग हे तंत्रज्ञानाचे युग समजले जाते. प्राथमिक शाळेपासून जर विद्यार्थ्यांना संगणकीय शिक्षण मिळाले तर खेड्यातील मुले सुद्धा शहरातील मुलांइतकेच तंत्रज्ञानात निपुण होतील, या उदात्त हेतूने ग्रामपंचायत सानेगाव-यशवंतखारच्यावतीने रायगड जिल्हा परिषद शाळा यशवंतखार या शाळेसाठी संगणक  प्रदान करण्यात आला. काळाच्यागतीने यशवंतखार शाळा आता डिजिटल शाळा झाली आहे.ग्रामपंचायतीच्या 15 व्या वित्त आयोग योजनेतून सदरचा निधी खर्च करण्यात आला आहे.


त्याचप्रमाणे आदिवासी बांधवांना मधील युवा पिढी सुदृढ व्हावी यासाठी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून तरुणांसाठी व्यायाम शाळेच्या साहित्याची तरतूद करण्यात आली आहे .प्रजासत्ताक दिनी शाळेसाठी संगणक व आदिवासी बांधवांसाठी व्यायाम शाळेचे साहित्य वाटप अशा गरजेच्या साहित्यांचे वाटप ग्राम पंचायतीच्यावतीने करण्यात आले.

यावेळी सरपंच सौ.स्वप्नाली संतोष भोईर,युवा नेतृत्व श्री.संतोष भोईर ,उपसरपंच सौ.अपर्णा दिवकर, विद्यमान सदस्य तुषार ठाकूर, गुलाब वाघमारे, संजय राणे, रविद्र ठाकूर, योगेश वाघमारे, शामित दिवकर,ग्रामसेवक सौ. पाटील मॅडम, रुचिता मोरे, गणेश मोरे तसेच अश्वीन भोपी,शाळेतील  शिक्षिका भोईर मॅडम,कुलकर्णी मॅडम तसेच यशवंतखार आदिवासीवाडी येथील व्यायाम शाळा साहित्य वितरणावेळी दिनेश वाघमारे, भगवान जाधव, नवश्या वाघमारे ,भावज्या जाधव सुभाष वाघमारे इ.ग्रामस्थ उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog