यशवंतखार येथे बंदरआळी वरचापाडा सामाजिक सभागृह बांधण्याच्या कामाचा शुभारंभ संपन्न  

रोहा-प्रतिनिधी

खासदार सुनिलजी तटकरे,पालकमंत्री आदितीताई तटकरे व कुशल संघटक आमदार अनिकेतभाई तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली रोहा तालुक्यातील यशवंतखार ग्रामपंचायतीमध्ये विकासकामांचा धुमधडाका सुरू आहे.विविध विकासकामे जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ.स्वप्नाली संतोष भोईर प्रामाणिकपणे प्रयत्न करित आहेत.

 त्याचप्रमाणे यशवंतखार ग्रामपंचायत क्षेत्रात जिल्हा परिषदेच्या खारगांव जिल्हापरिषद मतदार संघातील क्रियाशील जि.प. सदस्य आस्वाद पाटील यांचे जि.प.शेष फंड निधीतुन मंजुर विकास कामे सुरू आहेत.

त्याचाच एक भाग म्हणून आज मंगळवार दिनांक ४ जानेवारी २०२२ रोजी यशवंतखार गावातील बंदरआळी वरचापाडा सामाजिक सभागृह बांधण्याच्या कामाचा शुभारंभ गावातील मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला.यावेळी सरपंच सौ.स्वप्नाली संतोष भोईर,युवा नेते संतोष भोईर,तंटामुक्त गाव अध्यक्ष हरिभाऊ दिवकर, पांडुरंग भोईर, मधुकर तांबडे, मंगेश सुरणकर,ताई दिवकर, माधुरी दिवकर, मथुरा दिवकर, जनाबाई म्हात्रे, उषा दिवकर, हिरा पांडुरंग म्हात्रे परेश पाटील, अनिता म्हात्रे, वासुदेव दिवकर, भास्कर म्हात्रे, नथुराम दिवकर, मोहन म्हात्रे, दिपक दिवकर, रामभाऊ म्हात्रे, दिनेश वाघमारे, रामभाऊ पाटील इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

उद्धघाटन कार्यक्रमाचा व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा👇👇Comments

Popular posts from this blog