मुरुड तालुक्यामध्ये पहिल्यांदाच युवासेना शिवसेनाच्या  माध्यमातून  1 लाखाच्या दहीहंडीचे आयोजन - रोह्यातील  खारगाव कोळीवाडा   6 थर लावून ठरला पहिल्या  नंबरचा मानकरी...


शिवसेना जिल्हाप्रमुख  सुरेंद्र म्हात्रे  यांच्या कडून आयोजक युवसेना उपजिल्हा प्रमुख परेश  दादा  किल्लेकर यांचे कौतुक...



प्रतिनिधी - दीप वायडेकर 




           युवा सेना शिवसेनेच्या माध्यमातून पहिल्यांदाच युवासेना उपजिल्हा प्रमुख परेश दादा किल्लेकर आणि त्यांच्या सौभाग्यवती भाविका परेश किल्लेकर यांच्या माध्यमातून एक लाखाच्या भव्य दिव्य दहीहंडीचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेच्या अंतिम विजेते रोहा तालुक्यातील खारगाव कोळीवाडा हा ठरला. स्पर्धेमध्ये आकर्षक रोषणाई करण्यात आली  होती. तसेच लावणी सम्राज्ञी  स्वप्नाली कलमकर (अलिबागकर), शरयू मोरे यांचे नृत्य प्रदर्शन करण्यात आले. त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध आराध्य डान्स ‌ग्रुप यांचे सुद्धा नृत्य प्रदर्शन करण्यात आले. स्पर्धेकरिता जवळपास तालुक्यातील 15 पथकांनी समावेश दर्शवला होता. स्पर्धेला नागरिकांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद पाहायला मिळाला.


कार्यक्रमाकरिता प्रमुख उपस्थिती म्हणून रायगड जिल्हा शिवसेनाप्रमुख सुरेंद्र दादा म्हात्रे, अलिबाग तालुकाप्रमुख गिरीशजी शेळके ,युवा सेना तालुकाप्रमुख मारुती भगत ,चौल विभाग प्रमुख मंदार राणे, सुरेश झावरे, मुरुड तालुकाप्रमुख नौशाद दळवी तर प्रमुख आदेश दांडेकर माजी नगरसेवक मुरुड नगरपरिषद प्रमोद भायदे आदी मान्यवर उपस्थित होते...

Comments

Popular posts from this blog