वावेहवेली येथे खोडकिडा नियंत्रणा बाबत शेतकरयांना माहिती. 


तळा कृष्णा भोसले



                 वावे हवेली येथे भात पिकावर पडलेल्या खोडकिडा, करपा ई. कीड व रोग बाबत उपस्थित शेतकऱ्यांना माहिती देण्यात आली. खोडकिडा नियंत्रणासाठी Quinolphos २५% ई.सी प्रवाही २५ मि.ली/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी किंवा कॉरटॉप हायड्रोक्लोराइड ४% दाणेदार ६ किलो/एकर प्रमाणे वापर करावा.. तसेच करपा रोगासाठी ट्रायसाक्लोझोल 75 % डब्ल्यू.पी. १० ग्रॅम /प्रति १० लि.पाण्यात फवारणी करावी किंवा कॉपर ऑक्सिक्लोराइड २५ ग्रॅम अधिक स्ट्रेप्टोसायक्लिन सल्फेट ५ ग्रॅम/ दहा लि. पाण्यात मिसळून फवारणी करावी असा सल्ला शेतकऱ्यांना देण्यात आला. तसेच कीड-रोग सर्वेक्षण व सल्ला प्रकल्प अंतर्गत भात पिकाचे एकात्मिक कीड व रोग व्यवस्थापनाची भित्तीपत्रके समाज मंदिर वावे हवेली येथे लावण्यात आले..यावेळी शेती शेती शाळेचा ४ था वर्ग घेण्यात आला. शेतीशाळेत शिवार फेरी घेण्यात आली व श्री.बाळू रामजी वारंगे यांच्या नियंत्रित प्लॉट येथे भात पिकाचे कीड व रोग व त्यांच्या  व्यवस्थापनाबाबत कृषी पर्यवेक्षक श्री.जितेंद्र गोसावी व कृषी सहाय्यक श्री.योगेश कोळी यांनी मार्गदर्शन केले.


Comments

Popular posts from this blog