तळा तालुक्यातील प्राथमिक शिक्षक जगदीश कासे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.


तळा- किशोर पितळे 

          तळा तालुक्यातील चरई आदीवासीवाडी येथे कार्यरत असलेले जगदिश हिंरु कासे यांना यंदाचा सन २०२३ चा रा.जि.प. अलिबाग शिक्षण विभागाचा आदर्श शिक्षक पुरस्कारजाहीर झाला आहे.  तालुक्यातील २० वर्ष सेवा झाली असून मांदाड,वाशी महागांव, बहुलेवाडी अशा ग्रामीण भागातील विद्यार्थी पालक यांना प्राथमिक शाळेतून मिळणाऱ्या सोयी सवलती, शैक्षणीक दर्जा,शालेय उपक्रमाची जनजागृती करून पालकांचा ओढा प्राथमिक शाळेकडे येण्यासाठी प्रयत्न केले आहेत. विद्यार्थांच्या गुणवत्ता टिकून ठेवण्यासाठी लक्ष देत विद्यादानाचे काम केले आहे अशा पवित्र कामाची दखल शिक्षण विभागाने घेतली आहे.

डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्मदिन ५ सप्टेंबर हा शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. शिक्षण हा समाजाचा सर्वांगीण पाया असून समर्पित वृत्तीने काम करणाऱ्या शिक्षकांमुळेच समाज व राष्ट्राचा विकास होतो.प्राथमिक शिक्षक ग्रामीण भागातील तळागाळातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यास प्रयत्न करीत असतो. त्याला शिकवणे,टिकवणे यासारखे मोलाचे कार्य करतात.तसेच शैक्षणिक क्षेत्राला गुणवत्तेला स्वतःच्या विद्वत्तेनुसार नवप्रकल्पाद्वारे दिशा देण्याचे काम देखील करीत असतात. शालेय स्तरावर विविध सहशालेय उपक्रम राबवतात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी परिश्रम घेतात अशा समर्पित वृत्तीने काम करणाऱ्या शिक्षकांचा गुणगौरव व प्रोत्साहन देण्यासाठी आदर्श शिक्षक पुरस्कार हा दिला जातो यावर्षी तळा तालुक्यातील जगदीश हीरु कासे या गुणवंत शिक्षकाला रायगड जिल्हा परिषदेचा आदर्श शिक्षक पुरस्कार हा जाहीर झाला असून लवकरच या पुरस्काराचे वितरण होणार आहे अशी प्राप्त माहिती झाली आहे .

Comments

Popular posts from this blog