खारी गावच्या वारकरी सांप्रदायिक सेवाभावी वृत्तीच्या सुलोचना म्हस्के यांचे निधन.. 


खारी/रोहा (केशव म्हस्के)

                     रोहे तालुक्यातील खारगाव ग्राम पंचायत हद्दीतील मौजे खारी - काजुवाडी येथील वारकरी सांप्रदायिक सेवाभावी परोपकारी वृत्तीच्या सुलोचना(सखुबाई) पंढरीनाथ म्हस्के यांचे (कृष्ण जन्माष्टमी)बुधवार दि.०६ सप्टेंबर रोजी वयाच्या ७६ व्या वर्षी राहत्या घरी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले... 

          श्रीक्षेत्र देहू आळंदी - पंढरपूर ची नित्यनेमाने वारी करणाऱ्या वारकरी सांप्रदायिक विचारांची परंपरा जोपासणा- या सेवाभावी परोपकारी वृत्तीच्या सुलोचना(सखुबाई) पंढरीनाथ म्हस्के या अत्यंत प्रेमळ दयाळू क्षमाशील मन मिळावु स्वभावाच्या होत्या त्यांच्या निधनाची वार्ता समजताच आरे - चणेरा,धाटाव - किल्ला पंचक्रोशी परिसरातील वारकरी सांप्रदायिकसह स्वाध्याय परिवार,कुणबी समाज बांधव सामाजिक,शैक्षणिक,औद्योगिक,राजकीय आदी विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी मोठ्या संख्येने अंतयात्रे विधी प्रसंगी उपस्थिती दर्शवत अंतिम दर्शन घेत भावपुर्ण श्रध्दांजली वाहिली...   

  त्यांच्या पश्चात एक मुलगा,एक मुलगी,दोन भाऊ,दोन बहिणी,सूना,जावई,नातवंडे सगेसोयरे आप्तस्वकीय नातेवाईक असा मोठा परिवार असून त्यांच्या निधनाने म्हस्के,जांभेकर परिवारासह संपूर्ण पंचक्रोशीवर शोककळा पसरली असून सर्वत्र दुःखाचे सावट पसरले आहे..

    याप्रसंगी कुणबी समाज नेते सुरेश मगर,खारी गाव अध्यक्ष दत्तात्रेय काळे,देवकान्हे सरपंच वसंत भोईर,तंटा मुक्ती अध्यक्ष चंद्रकांत टिकोणे,समाज प्रबोधक हभप.बाळाराम महाराज शेळके,हभप.पुरुषोत्तम महाराज पाटील,उपसरपंच नितीन मालुसरे,सतेज आपणकर,माजी उपसरपंच मुरलीधर ठमके गुरुजी,पांडुरंग भोईर,नारायण भोईर,नथुराम उत्तेकर,लिलाधर खिरीट,पोलीस पाटील हरिश्चंद्र मालुसरे,आदी विविध क्षेत्रातील प्रतिष्ठित मान्यवर समाज बांधव बहुसंख्येने उपस्थित होते...

    त्यांचे दशक्रिया विधी शुक्रवार दि.१५/सप्टेंबर तर अंतिम धार्मिक विधी बारावे उत्तरकार्य रविवार दि.१७ सप्टेंबर२०२३ रोजी सकाळी १०:०० ते १२:०० वाजताच्या दरम्यान हभप.पुरुषोत्तम महाराज पाटील (धाटाव - रोहा) यांची कीर्तन सेवा होणार आहे तसेच सर्व धार्मिक विधी राहत्या घरी काजुवाडी(दामाणी नगर),पो.खारगाव - रोहा येथे होतील असे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले आहे...

Comments

Popular posts from this blog