अलिबाग येथे माविम संचलित ओम साई प्रेरणा साधन केंद्राची १४ वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न...


खारी/रोहा (केशव म्हस्के) :-तेजस्विनी महाराष्ट्र ग्रामीण महिला सक्षमीकरणकार्यक्रमांतर्गत 

महिला आर्थिक विकास महामंडळ संचलित

                     साई प्रेरणा लोकसंचलित साधन केंओमद्राची १४ वी वार्षिक सर्वसाधारण सभा सोमवार दि.०४/०९/२०२३ रोजी भाग्यलक्ष्मी हॉल अलिबाग येथे मोठ्या आनंददायी व उत्साहात संपन्न झाली..


         माविम रायगड जिल्हा समन्वयक अशोक चव्हाण  (D.C.O) सहाय्यक जिल्हा समन्वयक वर्षा पाटील,MIS ऑफिसर दिपक पोटभरे, रायगड जिल्हा उद्योग केंद्र महाव्यवस्थपक जी.एस. हरळय्या, खादी ग्रामोद्योग मंडळ व्यवस्थापक राजेश श्रीहरी सुरुंग,रा.जि.प. समाजकल्याण मा.सभापती श्री दिलीप(छोटम शेठ) भोईर,ICICI सेल्स मॅनेजर विजय थोरात,वैभव पाटील DUGKVY कर्जतचे प्लेसमेंट ऑफीसर दिनेश खैरनार,CMRC व्यवस्थापक शमिम चौधरी, अध्यक्षा प्रमिला गावडे,दत्तात्रय खिलारे उपजीविका सल्लागार CMRC अलिबाग.आदी प्रमुख मान्यवरांच्या शुभहस्ते दिप प्रज्वलन ज्ञानज्योती सावित्रीबाई फुलेंच्या प्रतिमेस पुष्पमाला अर्पण केले तदनंतर उपस्थित मान्यवरांचे पुष्प गुच्छ व अल्वेराचे रोपं देऊन सन्मानपूर्वक स्वागत करण्यात आले ..

    यावेळी सीएमआरसी कार्यकारणी व सर्व स्टाफ वर्गाने स्वरबध्द केलेले ईश स्तवन प्रार्थना व  स्वागत गीताचे सुमधुर आवाजामध्ये सादरीकरण केले.

      याप्रसंगी एकजुटितून अवतरेल,समृद्धीची नवप्रभा हे ब्रीद वाक्याची जोपासना व्हावी या उद्देशाने माविम रायगड जिल्हा समन्वयक अशोक चव्हाण (डीसीओ)सर आदी विविध शासकीय विभागाचे प्रमुख तज्ञ मार्गदर्शक मान्यवर मंडळींनी देखील महिलांनी आपली कौटुंबिक जबाबदारी सांभाळीत महिला बचत गटांच्या माध्यमातून विविध शासकीय योजनांचा लाभ घेत व्यावसायिक व उद्योजकता विकासाद्वारे कुटुंबाची आर्थिक उन्नती व प्रगती साधत राष्ट्राच्या प्रगती करिता हातभार व सहकार्य लाभावे असे मौलिक मार्गदर्शन केले...


      उपस्थित मान्यवरांच्या हस्ते तालुका व जिल्हास्तरावर उत्कृष्ट कार्य करणाऱ्या महिला बचत गटातील सहयोगी व सक्रिय महिला बचत गट तसेच समाजातील सुधारक पुरुषांचे देखील सन्मानचिन्ह देत सन्मानपूर्वक गौरविण्यात आले तद्नंतर  मनोरंजनात्मक सांस्कृतिक परंपरा व वारसा जपण्याच्या दृष्टीने महिला वर्गाने सुप्त गुणांना वाव देत विविध सांस्कृतिक कलागुणांचे उत्तम प्रकारे सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली तद्नंतर मध्यान्ह स्वादिष्ट गरमागरम स्नेहभोजनाचा आस्वाद घेत अगदी खेळीमेळीच्या आनंददायी वातावरणामध्ये कार्यक्रम संपन्न झाले..

         सदरील कार्यक्रमाचे प्रस्तावनाCMRC व्यवस्थापक शमीम चौधरी मॅडम व उपस्थितांचे आभार CMRC अध्यक्षा प्रमिला गावडे मॅडम यांनी मानले तर कार्यक्रम यशस्वीतेसाठी CMRC व्यवस्थापक शमिम चौधरी,अध्यक्षा प्रमिला गावडे,उपजीविका सल्लागार CMRC अलिबाग दत्तात्रेय खिलारे,कार्यालयीन स्टाफ कर्मचारी वृंद,स्वयं सहाय्यता महिला बचत गटांच्या महिला व सहयोगी महिला भगिनींनी अथक परिश्रम घेतले.. 

             प्रमुख मान्यवरांच्या शुभहस्ते दिप प्रज्वलन ज्ञानज्योती सावित्रीबाई फुलेंच्या प्रतिमेस पुष्पमाला अर्पण करताना माविम रायगड जिल्हा समन्वयक अशोक चव्हाण  (D.C.O) सहाय्यक जिल्हा समन्वयक वर्षा पाटील,MIS ऑफिसर दिपक पोटभरे, रायगड जिल्हा उद्योग केंद्र महाव्यवस्थपक जी.एस. हरळय्या,खादी ग्रामोद्योग मंडळ व्यवस्थापक राजेश श्रीहरी सुरुंग,रा.जि.प. समाजकल्याण मा.सभापती श्री दिलीप(छोटम शेठ) भोईर आदी मान्यवर..उपस्थित मान्यवरांच्या हस्ते तालुका व जिल्हास्तरावर उत्कृष्ट कार्य करणाऱ्या महिला बचत गटातील सहयोगी व सक्रिय महिला बचत गट तसेच समाजातील सुधारक पुरुषांचे सन्मान पूर्वक गौरविण्यात आले..

    छायाचित्र :- केशव म्हस्के (खारी/ रोहा)

Comments

Popular posts from this blog