रानभाज्यांचे संवर्धन आवश्यक -आ.अनिकेत तटकरे



महिला बचत गट भवनसाठी २५ लाखांचा निधी उपलब्ध करून देणार आ.तटकरे यांची घोषणा



तळा संजय रिकामे


                    रानभाज्या व गावठी भाज्यांना इतर भाज्यांपेक्षा अधिक मागणी आहे. आपल्या आरोग्यासाठी रानभाज्या आवश्यक आहेत. रानभाज्यांचे संर्वधन करण्याचे काम सर्वांनी केले पाहिजे, असे प्रतिपादन आमदार अनिकेत तटकरे यांनी केले. तळा तालुका कृषी अधिकारी कार्यालय आणि एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्पामार्फत गणेश मंगल सभागृह तळा येथे तालुकास्तरीय रानभाजी महोत्सव आयोजित करण्यात आला. या रानभाजी महोत्सवाचे उद्घाटन आमदार अनिकेत तटकरे यांच्या हस्ते करण्यात आले. यामध्ये सुमारे १५ बचत गटांमार्फत विविध प्रकारच्या रानभाज्यांचे प्रदर्शन करण्यात आले. यानिमित्त रानभाज्या पाककला स्पर्धा घेण्यात आली.आमदार तटकरे यांनी सर्व स्टॉलना भेट देऊन पाहणी केली. आमदार तटकरे म्हणाले, ‘‘लोकोपयोगी उपक्रम राबविण्याचे काम कृषी अधिकारी करत आहेत. त्यामुळे जास्तीत जास्त लोकांपर्यंत त्यांची माहिती पोहोचून त्यांना लाभ घेता येतो. रानभाज्या व गावठी भाज्यांना इतर भाज्यांपेक्षा मागणी आहे. आपल्या आरोग्यासाठी रानभाज्या आवश्यक आहेत. रानभाज्यांचे संर्वधन आवश्यक असून, यात सर्वांचा सहभाग गरजेचा असल्याचे त्यांनी सांगितले.महिला बचत गटाचा सहभाग हा मोठ्या प्रमाणावर असल्याने येणाऱ्या कालावधीत महिलांच्या आर्थिक उन्नतीसाठी तळा तालुक्यात महिला बचत गट भवनाची गरज असून या भवनासाठी २५ लाख रुपयांचा निधी मंत्री अदिती तटकरे यांच्या मार्फत मिळवून देण्याचे आश्वासन आ.तटकरे यांनी यावेळी दिले.                       


     
                               

           आंतराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ अंतर्गत शेतकरी प्रशिक्षण व जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला. त्यामध्ये पौष्टिक तृणधान्ये उत्पादन तंत्रज्ञान व पौष्टिक तृणधान्यांचे आहारातील महत्त्व याबाबत माहिती देण्यासाठी स्टॉल लावण्यात आला होता.यावेळी महाराष्ट्र शासन कृषी विभाग पुरस्कृत तळा किसान नवकृषक फार्मर्स प्रोडयुसर कंपनी लि.तळा या कंपनीचे उद्घाटन देखील आ.अनिकेत तटकरे यांच्या शुभ हस्ते करण्यात आले.रान भाजी महोत्सव निमित्ताने पाक कला स्पर्धेत पारितोषिक मिळविणाऱ्या महिलांचा प्रशस्ती पत्रक पुष्गुच्छ देऊन आ.तटकरे यांच्या हस्ते गौरविण्यात आले.यावेळी नगराध्यक्षा माधुरी घोलप,उपनगराध्यक्ष चंद्रकांत रोडे,रायगड जिल्हा महिला बालकल्याण अधिकारी निर्मला कुचिक,तहसीलदार स्वाती पाटील,महिला बालकल्याण अधिकारी तळा दिपाली शेळके,मागासवर्गीय रायगड जिल्हा अध्यक्ष ॲड.उत्तम जाधव,उपाध्यक्ष कैलास पायगुडे,राष्ट्रवादी काँग्रेस तालुका अध्यक्ष नाना भौड,शहर अध्यक्ष महेंद्र कजबजे,महिला अध्यक्षा जान्हवी शिंदे,नगरसेवक मंगेश शिगवण,अविनाश पिसाळ,तालुका कृषी अधिकारी आनंद कांबळे,महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Comments

Popular posts from this blog