रोह्यात गोकुळाष्टमी निमित्ताने हंडीला आणि शिंकाळ्याला वाढती मागणी...
खारी/रोहा (केशव म्हस्के)
सृष्टी चालक अखीलकोट ब्रह्मांडनायक भक्तजन पालक सकल जीवांचा प्राणसखा पूर्णावतार भगवान श्री कृष्णाचे जन्मोत्सव तीन दिवसांवर येऊन ठेपलेल्या गोपाळकाला गोविंदा निमित्ताने दही - हंडी करिता मातीच्या मडक्याचा हंडीला आणि शिंक्याला वाढती मागणी लक्षात घेता रोहे बाजार पेठेमध्ये नगर पालिका,दमखाडी नाका,सागर डेअरी आदी ठिकठिकाणी हंडी मडके विकण्यास कुंभार समाज बांधव सज्ज झाल्याचे दिसून येत आहेत...
भारतीय हिंदू संस्कृतीमध्ये श्रावण महिन्यास अधिक मास पुरुषोत्तम मास श्रावण महिन्यात आल्याने दुग्ध शर्करा योग जुळून आल्याने विशेषत्वाने अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे..
श्रावण महिना म्हणजे सणांचा राजा अशी देखील विशेष ओळख म्हणून श्रावण महिना उजाडले की सर्वत्र पांडव प्रताप,गुरू चरित्र,शिवलीलामृत,श्री हरी विजय भक्तिमय वातावरण निर्माण होते जणूकाही भक्ती चा महापूर येतो श्रावणी सोमवार,श्रावणी शनिवार,निमित्ताने भक्तिभावपूर्वक सर्वत्र आल्हाददायक व प्रसन्नता अध्यात्मिक व धार्मिक कार्यक्रमानिमित्ताने पांडव प्रताप,गुरू चरित्र,शिवलीलामृत,श्री हरी विजय आदी पौराणिक कथा ग्रंथांचे वाचन पारायण तर हरीपाठ,हरी,हरी जागर,भगवान शिव पिंडीवर अभिषेक नाग पंचमी,नारळी पौर्णिमा रक्षा बंधन,पाठोपाठ भगवान श्री कृष्णाचे जन्मोत्सव सोहळा गोकुळाष्टमी गोपाल काला असे एकापाठोपाठ एक असे सणांची रेलचेल सुरू झाली आहे...
दोन दिवसांवर येऊन ठेपलेल्या भगवान श्री कृष्णाचे जन्मोत्सव गोपाळ काला गोविंदा निमित्ताने दही - हंडी करिता मातीच्या मडक्याचा हांडीला आणि शिंक्याला वाढती मागणी लक्षात घेता रोहे बाजार पेठेमध्ये नगर पालिका,दमखाडी नाका,सागर डेअरी आदी ठिकठिकाणी हंडी मडके विकण्यास कुंभार समाज बांधव सज्ज झाल्याचे दिसून येत असून साधारण ८० ते १५० रुपये पर्यंत हंडी तर दोरखंड शिंके १००/- ते १२० रुपये पर्यंत विक्रीस उपलब्ध करण्यात आले आहेत...
Comments
Post a Comment