कु.जिजा हिच्या वाढदिवसानिमित्त आनंद वाडी येथे रंगणार शक्ती तुरा नाचाचा जंगी सामना.
तळा प्रतिनिधी- कृष्णा भोसले.
तळा तालुक्यातील आनंदवाडी येथील राजेश रामदास पेलणेकर यांची कन्या कु. जिजा हीच्या प्रथम वाढदिवसा निमित्ताने मंगलवार दि. १९ सप्टेंबर २०२३ रोजी दु. ३ वाजता शक्ती तुरा नाचाचा जंगी सामन्यांचे आयोजन आनंद वाडी तळा येथे करण्यात आले आहे.
तुरेवाले शंभूराजे घराण्यातील कै. काशीराम कुंभार यांचे शिष्य श्री गोविंद नामदे, बाजी पांडुरंग आणि गुरुवर्य लोकशाहीर तुकाराम मानकर यांचे पट्टशिष्य एकनाथ तु. घागरुम मु.रहाटाड ता. तळा चमत्कार नाच मडंळ रहाटाड कोळीवाडा मार्गदर्शक अशोक पदया पाटील कोरस मोरेश्वर घागरुम ,नामदेव म्हाशा ढोळकी पट्टु उदेश तळकर,भरत माणेकर, अशी तुरेवाले मंडळीअसणार आहे.
तर शक्तीवाले गुरुवर्य भजन सम्राट मेंदाडकर श्री महादेव माने गुरुवर्य शाहीर कै. सदाशिव लक्ष्मण मानकर यांचे शिष्य अजय स मानकर मु.मादांड ता. तळा काळभैरव नृत्य कला
पथक सहगायक श्री प्रभाकर श्री विजय वस्ताद श्री नथुराम साधु ढोळकी पट्टु नवनाथ पाटील ,नवनाथ हमक शैली वादक, सुरेश पाटील, तुषार कपले,असा सामना रंगणार आहे.
या कार्यक्रमालाआनंदवाडी ग्रामस्थ, क्षत्रिय मराठा समाज, क्रिकेट असोसिएशन तळा, सामाजिक व राजकीय संघटनेचे पदाधिकारी या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाचे स्वागतोत्सुक राजे प्रतिष्ठान असुन मोठ्या संख्येने रसीकजनांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन राजेश पेलणेकर यांनी केले आहे.
Comments
Post a Comment