खा.सुनील तटकरे यांच्या हस्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर भवनाचे भूमिपूजन



तळा संजय रिकामे


                    तळा येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर भवनाचा उपयोग समाजातील मुला-मुलींच्या राहण्याची सोय,वयोवृद्ध समाजबांधव यांना हक्काची जागा, समाजातील विविध कार्यक्रमांची सोय, तसेच इतर महत्वाच्या सभा मिटींगसाठी तर उपयोगी ठरणार असून हे समाजभवन समाजाच्या विकासाचं महत्वाचं केंद्र बिंदू ठरेल, असे प्रतिपादन रायगडचे खा.सुनील तटकरे यांनी केले.तळा येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर भवनाचे भूमिपूजन खा.तटकरे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस मागासवर्गीय सेल रायगड जिल्हा अध्यक्ष ॲड.उत्तम जाधव,रायगड जिल्हा उपाध्यक्ष कैलास पायगुडे,माजी राजिप सभापती गीता जाधव ,तालुका अध्यक्ष नाना भौड,बौध्दजन पंचायत समिती तळा तालुका अध्यक्ष अनंत मोरे,सचिव किशोर मोरे, सरपंच विमल जगताप ,माजी अध्यक्ष रामदास मोरे,धनराज गायकवाड,प्रकाश गायकवाड,माजी सरपंच तानाजी कालप, किशोर शिंदे,नामदेव जाधव,लक्ष्मण तांबे,चिंतामण नाकते गणेश तांबे,दीपक पवार आदी मान्यवर उपस्थित होते.ते म्हणाले की, तळा शहरात हे बहुउपयोगी असे भवन उभे राहत आहे. त्यामुळे तळा शहर व तालुक्यातील बांधवांना याचा फायदा होईल. या ठिकाणी विविध समाजउपयोगी कार्यक्रम पार पडतील.इतर समाजातील बांधवांनी देखील याचा आदर्श घ्यावा. समाज बांधवांच्या ज्या मागण्या असतील त्या शासन दरबारी पाठपुरावा करून त्या महायुती सरकारच्या माध्यमातून सोडविण्यास आपण कटिबद्ध आहोत असे त्यांनी सांगितले. 


   
                                                                               

           मागासवर्गीय सेल रायगड जिल्हा अध्यक्ष ॲड.उत्तम जाधव यांनी रायगड जिल्ह्यात खा.तटकरे साहेब हेच विकासकामे करू शकतात त्यांना सत्तेची गरज नाही,साहेबांच्या माध्यमातून बांधण्यात येणारे डॉ.बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन सगळ्यांना प्रेरणा देईल असे प्रतिपादन देखील जाधव यांनी केले. बौध्दजन पंचायत समिती तळा तालुका माजी अध्यक्ष रामदास मोरे यांनी सांगितले की २५ लक्ष खर्च करून भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे भवन होत आहे ही अत्यंत चांगली गोष्ट असून सरकार कोणाचेही असो विकासकामे करण्यात पारंगत असणारे तटकरे साहेबच ही किमया करू शकतात येणाऱ्या पुढील काळात तटकरे साहेबांच्या पाठीमागे आमचा बांधव ठाम पणे असेल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.या कार्यक्रमाची वेळ दुपारी ३.वाजता होती खा.तटकरे उशीरा आल्याने भूमिपूजन ५.०० वाजता भर पावसात करण्यात आले. सर्व समाज बांधवांनी उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवली त्यासाठी सर्वांचे आभार  ॲड.उत्तम जाधव यांनी मानले.

Comments

Popular posts from this blog