नाभिक समाज तळा फोंडलवाडी सामाजिक सभागृह उद्घाटन व संत सेना महाराज पुण्यतिथी साजरी
तळा- किशोर पितळे
नाभिक समाजाचे आराध्य दैवत संत सेना महाराज यांच्या पुण्यतिथीचे निमित्ताने सामाजिक सभागृहाचे उद्घाटन व वास्तुशांती समारंभ आज ११सप्टेंबर २०२३ रोजी शिवसेना तालुका प्रमुख प्रद्युम्न ठसाळ, शहर प्रमुख राकेश वडके यांच्या प्रमुख उपस्थितीत श्रीफळ वाढवून व फित कापून उद्घाटन करण्यात आले.त्यापूर्वी वास्तूचे पूजन, होम हवन व संत श्रेष्ठ सेना महाराज यांच्या पुण्यतिथीचे पुजा विधीचे आयोजन करण्यात आले होते.सकाळी ७ वाजता वास्तुशांती कार्यक्रम संत सेना महाराज व वीर भाई कोतवाल यांच्या प्रतिमांना पुष्पमालिका अर्पुन कार्यक्रमाची सुरुवात झाली. या कार्यक्रमाला कोअर कमिटी सदस्य तथा स्वीकृत नगरसेवक लिलाधर खातू,नगरसेवक नरेश सुर्वे,माजी सरपंच नमित पांढरकामे,उपतालुका प्रमुख तांदळेकर, शशी ठमके,ज्येष्ठ समाज बांधव मारुती शिर्के व्यासपीठा वर उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन करताना ठसाळ म्हणाले की तळा येथील नाभिक समाज यांची माननीय आमदार भरत शेठ गोगावले व जिल्हाध्यक्ष प्रमोद घोसाळकर यांच्या सहकार्यातून आमदार फंडातून ११ लाख निधी उपलब्ध करून समाजाची उणीव भरून काढली.या ११ लाखांमध्ये ही वास्तू पूर्ण झाली आहे.आज सुंदर असे सभागृह झाल्यामुळे नाभिक समाजबांधवाच्या चेहऱ्यावर पाहून आम्हाला आम्ही केलेल्या कामाचं सार्थक झाले.वाडीतील फ्लेवर ब्लाॅक बसवून देऊ असे आश्वासन दिले.यावेळी लीलाधर खातू यांनी देखील मनोगतातून सांगितले की विधानसभा निवडणुकीच्या वेळी जो शब्द दिला होता तो आज शिवसेनेच्या माध्यमातून पूर्ण करू शकलो आणि आज त्याचं संतश्रेष्ठ सेना महाराज यांच्या पुण्यतिथी दिनी लोकांर्पण होत असल्याचा आम्हाला आनंद आहे कितीही मोठ्या अडचणी आल्या तरी देखील आम्ही सभागृह बांधून देऊ अशी ग्वाही दिली होती आणि ती आज पूर्ण झाली माझ्या समाज बांधवांनी दिलेले सहकार्यातून आज सगळं झालेल आहे असे त्यांनी मत व्यक्त केले.या कार्यक्रमासाठी अध्यक्ष रुपेश साळुंखे, उपाध्यक्ष संजय शिर्के,सचिव वैभव शिर्के,सल्लागार मंगेश शिर्के,योगेश शिर्के,मनोज साळुंखे,किशोर कदम, अशोक खंडागळे, सुभाष शिर्के, समाज बांधव व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Comments
Post a Comment