खारी /रोहा (केशव म्हस्के ):-
रोहे कोलाड वाण्याची तळवळी येथील हभप.नंदकुमार तेलंगे महाराजांच्या निवासस्थानी गुरुवर्य गणेश नाथ महाराज, गुरुवर्य हरिश्चंद्र पाटील गुरुकुल खारपाले यांच्या कृपाशिर्वादाने पुरुषोत्तम अधिक श्रावण मास आणि नीज श्रावण निमित्ताने सलग ५८ दिवस श्री मद भागवत पारायण सोहळा आणि रामकृष्णहरी दिव्य मंत्राचे नामस्मरण जप यज्ञ, श्रावण सप्ताह त्याअनुषंगाने विविध अध्यात्मिक व धार्मिक उपक्रम राबविण्यात आले १५ सप्टेंबर २०२३ रोजी रायगड भूषण हभप.मारुती महाराज कोल्हाटकर यांची प्रवचन सेवा दिपोत्सव साजरा करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली..
याप्रसंगी कोलाड वारकरी सांप्रदायिक हभप.नारायण महाराज दहिंबेकर, ग.रा.गोरीवळे,हभप.अनिल सानप,अनंत सानप,महिला भगिनी ग्रामस्थ मंडळी आदी भाविक भक्तांनी बहुसंख्येने उपस्थित दर्शवत कार्यक्रमाची शोभा वाढविली...
छायाचित्र:- केशव म्हस्के (खारी/ रोहा)
Comments
Post a Comment