रोहे वरसगाव येथे ०२ ऑक्टो.रोजी कै.गुरुवर्य पट्टे तुकाराम वस्ताद यांची ३२ वी पुण्यतिथी सोहळा व श्री सत्यनारायण महापूजेचे आयोजन..
खारी/ रोहा (केशव म्हस्के)
रोहे तालुक्यातील वरसगाव पद् मावती नगर येथील सामाजिक कार्यकर्ते अनंत तुकाराम आंब्रुस्कर यांचे पिताश्री कै.गुरुवर्य पट्टे तुकाराम वस्ताद यांची ३२ वी पुण्यतिथी सोहळा व श्री सत्यनारायणाची महापूजा सोमवार ०२/ऑक्टोंबर/ २०२३ रोजी समस्त अजित अनंत आंब्रुस्कर ( वरसगाव ग्रा.पं.सदस्य)परिवार व आदिशक्ती कलगी तरुण मित्र मंडळ रोहा - माणगाव - सुधागड यांच्या सहकार्याने विविध सांस्कृतिक अध्यात्मिक व धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे...
वरसगाव चे आराध्य ग्राम दैवत सापया महाराजांच्या कृपाशिर्वादाने वरसगाव पद् मावती नगर येथील ग्राम पंचायत सदस्य अजित अनंत आंब्रुस्कर तसेच समस्त आंब्रुस्कर परिवार आणि आदिशक्ती कलगी तरुण मित्र मंडळ रोहा - माणगाव - सुधागड यांच्या सहकार्याने सोमवार दि.०२/ऑक्टोंबर/ २०२३ रोजी कै.गुरुवर्य पट्टे तुकाराम वस्ताद यांची ३२ वी पुण्यतिथी सोहळया निमित्ताने श्री सत्यनारायणाची महापूजा पुरोहित महेश जंगम,सकाळी ११:०० वाजता कै.गुरुवर्य तुकाराम वस्ताद यांचे जीवन चरित्र वर्णन,दुपारी १२:०० कलगी शक्तीवाले शाहिर बिनेश दिलीप वाजे - मु. गोविले, लांजा - रत्नागिरी, तुरेवाले शाहीर ओमकार आगरकर मु. खारगाव,कोळीवाडा, ता. म्हसळा - रायगड तर सायंकाळी ०६:०० हरिपाठ नेतृत्व हभप.अनिल महाराज सानप वरसगाव,रात्रौ.१०:०० आनंदीमाता भजन मंडळ - ढोकळेवाडी आदी विविध सांस्कृतिक अध्यात्मिक व धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
आपल्या पूर्वजांनी ग्रामीण संस्कृती टिकविण्यासाठीचे मोलाचे योगदान देत पूर्वापार चालत आलेल्या चाली - रूढी परंपरांना चालना देण्यासाठी विविध सांस्कृतिक मंडळाची स्थापना करण्यात येत असे त्यांच्या माध्यमातूनच ग्रामीण भागातील जुनी जाणती प्रतिष्ठित मान्यवर मंडळी गावांतील तरुणांना कलावंतांना एकत्रित करण्याचे प्रयत्न करून आपल्या वाड - वडिलांना जोपासलेले व नावलौकिक मिळविलेल्या डफा वरील डब्बल बारी भजन,कलगी शक्ती - तुरा बाळ्या नाच,खर्डी नाच,धार्मिक ग्रंथ शास्त्र पुराणांचे शास्त्रीय आधार घेत शायरी गायकी यामध्ये प्राविण्य प्राप्त मंडळींना आदराने गुरुस्थानी मानून वस्ताद म्हटले जात..
सदरील कार्यक्रम यशस्वीतेसाठी अनंत तुकाराम आंब्रुस्कर,सुरेश तुकाराम आंब्रुस्कर,अजित अनंत आंब्रुस्कर,अमर अनंत आंब्रुस्कर,ग्रामस्थ मंडळ वरसगाव पद् मावती नगर,श्री गणराज मित्र मंडळ सापया क्रीडा मंडळ व महिला मंडळ वरसगाव आदी विविध क्षेत्रातील कलावंत मान्यवर मंडळी अथक परिश्रम घेत आहेत...
Comments
Post a Comment