तळा तालुक्यातील ४१२० लाडक्या बाप्पांना भावपूर्ण निरोप
तळा किशोर पितळे
ढोल ताशे, बँड पथक,बेंजोच्या तालावर मिरवणुका काढत, ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर’ च्या जय जयकारात लाडक्या बाप्पाला तळा तालुक्यातील गणरायांना निरोप देण्यात आला.दिड दिवसाचे १४०८,पाच दिवसांचे २७१२ तर अनंत चतुर्थी ७८ विसर्जंन बाकी आहेत.तालुक्यात ४२०० गणपती असून एकही सार्वजनिक मंडळाचा गणपती नाही.जिल्ह्यातील ५८७४ घरगुती गणेशमूर्ती बरोबर गौरींचेही विसर्जन सर्वत्र करण्यात आले.भाद्रपद चतुर्थीलागणेश मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली होती.चार दिवस गणरायाची मनोभावे सेवा केल्यानंतर शनिवारी गौरी-गणपतींचे विसर्जन करण्यात आले. गौरीसह मोठ्या प्रमाणावर गणेश मूर्तींचे विसर्जन होणार असल्याने शहरासह ग्रामीण भागात प्रमुख विसर्जन स्थळांवर पोलीस यंत्रणेकडून बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.चौथ्या दिवशी गौरीसमवेत विसर्जन करणाऱ्या गणेश मूर्तींची संख्या तालुक्यात वाढली होती.कोरोना काळात चाकरमानी गावाकडे न आल्याने शासनाच्या नियमाप्रमाणे निवासस्थानी शहरात गणपती बाप्पाची सण साजरा केला. मात्र या वर्षी भाविकांनी गावाकडचे गणपतीची प्राणप्रतिष्ठापना करून आनंद द्विगुणित केला.रात्री १२ वाजेपर्यंतच मिरवणूकीत वाद्य वाजविण्यासाठी शासनाने परवानगी दिली असल्याने तत्पूर्वी विसर्जनासाठी भाविकांची घाई झाली होती. त्यामुळे विसर्जन घाटावर भाविकांची गर्दी फुलली होती.दुपारी आरतीनंतर अनेकभाविकांनी गणेशमूर्ती मखरातून बाहेर काढल्या होत्या.दिवसभर पावसाने खरे रुप धारण करून काहीजणांची तारांबळ केली. काही वेळाने विश्रांती घेतल्याने विसर्जनासाठी उशीरा बाहेर काढून सवाद्य विसर्जन मिरवणूका, गुलालाची उधळण करीत काढण्यातआल्या.
भजन जय जयकार करीत"गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या," निरोप घेतो देवा आता आज्ञा असावी, चुकले आमचे काही तर क्षमा असावी !! गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या !!अशा जयघोषात हातगाडी, रिक्षा,कार, बोलेरो,टेम्पो,मधून गणेशमूर्ती विसर्जना साठी नेण्यात येत होत्या.ग्रामीण भागात तर पुरूषांनी डोक्यावर गणेशमूर्ती घेतली होती. काही भाविक निरोपाची आरती करून आले होते तर काही भाविकांनी विसर्जन घाटावर आरती केली.शहरातील मोदी तलाव, महादेव तलाव,पुसाटी तलाव विसर्जनासाठी भाविकांची दुपार पासूनच ये जा सुरू होती.विसर्जनस्थळी गर्दी होऊ नये.अनुचीत प्रकार घडू नये यासाठी पोलिस प्रशासना नी बंदोबस्त चोख ठेवला होता.निर्माल्य संकलनासाठी नगरपंचायतीने खास व्यवस्था करण्यात आली होती.तळा पोलिस ठाणे पोलिस निरीक्षक कैलास डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख व्यवस्था केली होती. अतीशय आनंदी, उत्साही वातावरणात भक्तीभावाने लाडक्या विघ्नहर्ता गणरायाला भावपुर्ण निरोप दिला.
Comments
Post a Comment