महिलांच्या अंगी असलेल्या कला गुणांना वाव देण्यासाठी हा आमचा प्रयत्न - नामदार आदिती तटकरे

४० संघामधे प्रथम क्रमांक समर्थ नगर तळा यांनी पटकावला.

तळा- (किशोर पितळे) 

           श्रावण महिन्याचे औचित्य साधून तळा तालुक्यात भव्य श्रावणसरी नृत्य स्पर्धेचे आयोजन राष्ट्रवादी काँग्रेस कडून करण्यात आले. ३ सप्टेंबर २३ रोजी कुणबी समाज हाॅल पिटसई येथे आयोजित केले होते. यावेळी महिला व बालकल्याण मंत्री आदितीताई तटकरे म्हणाल्या की महिलांना आपल्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी आम्ही हा प्रयत्न करत असतो. जेणेकरून तिला सुध्दा घरातील कामातून बाहेर पडून आनंद घेता येईल. ग्रामीण भागातील महिला एवढ्या छान नृत्य करतात हे बघून मला खुप आनंद झाला आहे तसेच यावेळी नृत्य स्पर्धांसाठी जागा कमी पडली हे दिसून आले आहे तर पुढील वर्षी आपण खूप मोठी जागा उपलब्ध करून  घ्या अशा सुचना केल्या.


                        यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष नाना भौड, महिला अध्यक्षा जान्हवी शिंदे,माजी महिला व बालकल्याण सभापती गीताताई जाधव, माजी पंचायत समिती सभापती अक्षरा कदम, उपनगराध्यक्ष चंद्रकांत रोडे ,युवक अध्यक्ष नागेश लोखंडे, शहर अध्यक्षा मेघा सुतार,ज्योती पायगुडे, सर्व सरपंच,राष्ट्रवादी कार्यकर्त्ये, नृत्य सादर करणाऱ्या महिला आदि मान्यवर उपस्थित होते यावेळी या स्पर्धेत ग्रामीण व शहरी अशा एकूण ४० संघांनी भाग घेतला होता.पारंपारिक नृत्य सगळ्या महिला वर्गांतून छान सादरीकरण करण्यात आले.या नृत्य स्पर्धेतून कोणत्या संघांचे नंबर काढावे असा प्रश्न परीक्षकां समोर आला असेल असे नृत्य सादरीकरण झाले होते.या स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावलेल्या महिलांनी चांद्रयानाची यशस्वी मोहिम हे नृत्यामध्ये शेवट करून देशाबद्दल असणारा अभिमान येथे दाखविण्याचा प्रयत्न केला.या नृत्य स्पर्धेत प्रथम क्रमांक समर्थ नगर  तळा यांनी पटकाविले तर द्वितीय चाळके पार्टीमहिलामंडळ कर्नाळा तृतीय क्रमांक वाघेश्वरी महिला मंडळ वरळने पटकाविले उत्तेजनार्थ. वांजलोशी महिला मंडळ यांना मिळाला व दुसरा उत्तेजनार्थ पद्मावती ग्रुपकुंभारआळी यांना मिळाला यांना सन्मानचिन्ह व रोख रक्कम २०००/- बक्षिस मान्यवरांचे हस्ते देण्यात आली.या कार्यक्रमावेळी विशेष असे गरोदर मातांचे ओटीभरण कार्यक्रम करण्यात आले.

Comments

Popular posts from this blog