सामाजिक सभागृहासाठी एक कोटी- खासदार सुनील तटकरे
तळा-संजय रिकामे
तळा तालुक्यातील विविध विकास कामासाठी खा.सुनील तटकरे यांनी वेळोवेळी विविध योजनेच्या माध्यमातून कोट्यावधींचा निधी मंजूर करून विकास कामांना गती दिली. तळा शहरात कुणबी समाज बांधवांचे भव्य दिव्य सभागृह व्हावे आणि समाज बांधवांची सोय व्हावी यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश अध्यक्ष खा.सुनील तटकरे एक कोटी रुपये उपलब्ध करून देणार असून पहिल्या टप्प्यात ५५ लाख रुपयांचा निधी मंजूर करून दिला आहे. उर्वरित ४५ लाखांचा निधी लवकरच उपलब्ध करून दिला जाईल अशी ग्वाही यावेळी खा.तटकरे यांनी दिली.यावेळी पहिल्या टप्प्यातील ५५ लाख रुपयांच्या मंजुरीचे पत्र कुणबी समाजाचे ग्रामीण व मुंबई पदाधिकारी यांच्याकडे सुपुर्द करण्यात आले. यामध्ये खा.सुनील तटकरे यांच्या खासदार फंडातून २५ लाख,महिला बालकल्याण मंत्री ना.अदिती तटकरे यांच्या आमदार फंडातून १५ लाख आणि आ.अनिकेत तटकरे यांच्या आमदार फंडातून १५ लाख अशा प्रकारचा विकासनिधी उपलब्ध करून दिला गेलेला आहे.समाजाच्या भविष्यकालीन प्रगतीसाठी प्रबोधन, स्पर्धा परीक्षा,मार्गदर्शन केंद्र,अभ्यासिका व्यवसाय विषयक उपक्रम, वधू वर परिचय विवाह समारंभ यासारखे अनेक उपक्रम यशस्वी करण्यासाठी या प्रशस्त सभागृहाचा उपयोग होणार असल्यामुळे कुणबी बांधवांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
रायगडचे लोकप्रिय खा.सुनील तटकरे,महिला बालविकास मंत्री ना.अदिती तटकरे,आ.अनिकेत तटकरे यांचे सर्वांनी आभार मानले असून खा.तटकरे कुटुंबाच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचा निर्धार यावेळी पदाधिकारी यांनी व्यक्त केला.
Comments
Post a Comment