स्व.चंद्रकांत आपणकर गुरुजी यांच्या तृतीय पुण्यस्मरण दिनी आयोजित रक्तदान शिबीरास उत्स्फूर्त प्रतिसाद.


तब्बल ६० रक्तदात्यांने उत्स्फूर्तपणे केले रक्तदान..


खारी/रोहा (केशव म्हस्के)

                    रोहा तालुक्यातील खारगाव ग्राम पंचायत हद्दीमधील मौजे खारी येथील हनुमान मंदिर सभागृह येथे आज रविवार दिनांक.०३ सप्टेंबर २०२३ रोजी आदर्श शिक्षक जेष्ठ समाज सेवक स्वर्गीय चंद्रकांत गोविंद आपणकर गुरुजी ( चंदूभाई) यांच्या तृतीय (पुण्यस्मरण) स्मुर्ती दिनाचे औचित्य साधत आपणकर परीवाराच्या वतीने राज्य रक्त संक्रमण परिषद ब्लड बँक - अलिबाग यांच्या सहकार्याने आयोजित रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद लाभले...


            शुभारंभ प्रसंगी उपस्थित प्रमुख मान्यवरांच्या हस्ते दिप प्रज्वलन,आदर्श शिक्षक स्व.आपणकर गुरुजी यांच्या प्रतिमेल अर्पण करून आदरांजली भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतावेळीस सतेज आपणकर,श्रीमती.गुलाब ताई आपणकर,यांनी आपले भावनिक मनोगत व्यक्त करताना स्व.आपणकर गुरुजींच्या प्रती आठवणींना उजाळा देत अत्यंत भाव विभोर अश्रूंनी आपल्या भावना व्यक्त केल्याने उपस्थितांच्या मनामध्ये देखील गुरुजीं बद्दलच्या भावना दाटून आल्याचे चित्र दिसून येत होते. वडिलांच्या स्मरणार्थ दरवर्षी रक्तदान शिबिर आयोजित करण्यात मनोदय व्यक्त केले तदनंतर रक्तदान शिबिरास प्रारंभ करण्यात आले ..


      याप्रसंगी ग्रूप ग्राम पंचायत खारगाव माजी सरपंच सेवा निवृत्त शिक्षिका श्रीमती गुलाबताई आपणकर,डॉ.तेजकुमर आपणकर, विद्यमान सरपंच सलोनी आपणकर,तंटा मुक्ती समितीचे माजी अध्यक्ष सतेज आपणकर खारी गावचे अध्यक्ष दत्तात्रेय काळे,गुरू नगर अध्यक्ष पी.ए.देशमुख,रक्त संक्रमण अधिकारी रायगड जिल्हा रक्त केंद्र प्रमुख डॉ.दिपक गोसावी,फरीद अफवारे(जनसंपर्क अधिकारी जिल्हा रक्त केंद्र अलिबाग) ,संतोष ढाकणे,उमेश पाटील (अधि परिचारक - जिल्हा रुग्णालय अलिबाग) महेश घाडगे, सतेज आपणकर मित्र परिवार मंडळी सह विविध क्षेत्रातील प्रतिष्ठित मान्यवर आणि खारी, तारेघर,खारगाव, आरे खुर्द, आरे बुद्रुक,गौळवाडी, खातेलीवाडी,कुंभोशि पंचक्रोशी परिसरातील सामाजिक कार्यकर्ते व रक्तदाते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

       एक सामाजिक भान ठेवून समाजाप्रती एक जबाबदारी लक्षात घेऊन रक्तदान  सर्व श्रेष्ठ दान हे राष्ट्रीय कर्तव्य समजून सामाजिक बांधिलकी जपण्याच्या दृष्टीने संकल्पित तब्बल ६० पेक्षा अधिक रक्तदात्यांनी स्वयंस्फूर्ती उत्स्फर्तपणे रक्तदान केले.

     कार्यक्रम यशस्वीतेकरिता डॉ.तेजकुमार आपणकर,सतेज आपणकर आदी मित्र परिवाराने अथक परिश्रम घेतले....


                     रक्तदान शिबिर प्रसंगी दिप प्रज्वलन,आदर्श शिक्षक स्व.आपणकर गुरुजींच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहताना ग्रूप ग्राम पंचायत खारगाव माजी सरपंच सेवा निवृत्त शिक्षिका श्रीमती गुलाबताई आपणकर,डॉ.तेजकुमर आपणकर, विद्यमान सरपंच सलोनी आपणकर,तंटा मुक्ती समितीचे माजी अध्यक्ष सतेज आपणकर खारी गावचे अध्यक्ष दत्तात्रेय काळे,गुरू नगर अध्यक्ष पी.ए.देशमुख,रक्त संक्रमण अधिकारी रायगड जिल्हा रक्त केंद्र प्रमुख डॉ.दिपक गोसावी,आदी विविध क्षेत्रातील प्रतिष्ठित मान्यवर..

२) रक्तदाते स्वयंस्फूर्ती उत्स्फर्तपणे रक्तदान करताना..

छायाचित्र :- केशव म्हस्के (खारी/रोहा)

Comments

Popular posts from this blog