कोलाड सारख्या मातीतून सुनील तटकरे सारखे नेतृत्व देशाला मिळाले हे सर्वांचे भाग्य- कृषिमंत्री धनंजय मुंडे

कोलाड नाक्यावरुन राष्ट्रवादीने लोकसभेचे रणशिंग फुंकले


राष्ट्रवादीच्या बालेकिल्यात तुतारी. उभाटा, शेकापची जादू चालणार नाही-- राष्ट्रवादी


कोलाड  11 मार्च (शरद जाधव)

         कोलाड  सारख्या ग्रामीण भागातून एक नेतृत्व तयार होतो आणि दिल्लीचे तख्त गाजवतो हे एका दिवसात उभे राहिलेले नेतृत्व नाही तुमची देखील ताकद मिळाली म्हणून कोलाडच्या मातीतून सुनिल तटकरे सारखे नेतृत्व देशाला लाभले हे तुम्हा सर्वांचे भाग्य असे गौरवोद्गार कृषी मंत्री व स्टार प्रचार प्रमुख धनंजय मुंडे यांनी काढले.


          कोलाड येथे नाना नानी पार्क कामाच्या भूमिपूजन व कार्यकर्ता मेळावा प्रसंगी ते बोलत होते.व्यासपीठावर खासदार सुनील तटकरे ,मंत्री आदिती ताई तटकरे, आमदार अनिकेत भाई तटकरे,नाना भोड, जि प सदस्य दया पवार,सरपंच सुरेश दादा महाबळे, ज्येष्ठ नेते नारायण धनवी, रामचंद्र चितळकर, तालुका अध्यक्ष प्रितम पाटील, विभागीय अध्यक्ष नरेंद्र जाधव, रामचंद्र चितळकर,नगरसेवक महेंद्र गुजर,मयूर दिवेकर, महेश कोल्हटकर, महेंद्र पोटफोडे,मनोज शिर्के, दशरथ साळवी, राकेश शिंदे, प्रकाश थिटे, वसंत मरवडे,संजय मांडलुस्कर,विशाखा राजिवले, बाबुराव बामणे आदी मान्यवर उपस्थित होते.

      धनंजय मुंढे  पुढे म्हणाले की स्वर्गीय अण्णा दत्ताजीराव तटकरे यांना आमदार होता आले नाही परंतु त्यांच्या आशीर्वादातून सुनील तटकरे आमदार झाले आणि आज रायगडचे तख्त दिल्लीत गाजतय ही सोपी गोष्ट नाही. राजकारण, समाजकारण माध्यमातून तटकरे परिवारातून आदिती आणि अनिकेतच्या माध्यमातून तीन पिढ्यांचे नाते तुमचे आमचे तयार झाले आहे. 

   सुनिल तटकरे यांनी कोकणासाठी केलेले काम हे अद्भुत आहे सर्वसामान्यांना केंद्रबिंदू ठेवून साहेबांनी काम केले म्हणून आज त्यांचे समर्थ नेतृत्व उभे राहिले आहे.रायगडच्या भूमीला संत महात्म्यांचा व शिवाजी महाराजांचा फार मोठा इतिहास आहे आजच्या पिढीने इतिहास वाचला पाहिजे आज कोलाडला संभाजी महाराजांचे स्मारक उभे राहत आहे रायगडात पहिले स्मारक उभे राहत आहे अनिकेत आदिती तिच्या दूरदृष्टीचे खरोखरच कौतुक स्मारकाच्या माध्यमातून राजाचा इतिहास पुढच्या पिढी करिता जिवंत ठेवण्याचे काम त्यांनी केले.

     इथल्या जनतेला तटकरे साहेबांना खासदार म्हणून पाठवण्याची फार मोठी घाई झाली आहे इतकी प्रेम इथे जमलेल्या गर्दीवरून दिसून येते म्हणून आदिती बोलली या बालेकिल्ल्यातून दहा हजार चा लीड द्या पण मी थोडं जास्त बोलेन की या मतदारसंघातून 11000 विक्रमी मते देऊन साहेबांना दिल्लीत पाठवा असे धनंजय मुंडे यांनी कार्यकर्त्यांना आवाहन केले

    आम्ही २ जूनला महाराष्ट्र मध्ये जो निर्णय घेतला तो संबंध देशाच्या विकासासाठी घेतला पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या माध्यमातून दहा वर्षात झालेल्या विकासाला तोड नाही व  त्यांचे हात अधिक बळकट  करण्यासाठी विकासाला साथ दिली असे धनंजय मुंडे यांनी उपस्थितांना सांगितले.तर अण्णांच्या निधना नंतर या भागाने कधीही पोरकेपणा वाटू दिला नाही. या भागाच्या पुण्याईमुळे अनेक पदे मिळाली आता येणारा काळ निवडणुकीचा काळ  आहे. त्यामुळे समज गैरसमज केले जातील याकडे दुर्लक्ष करा आपला पक्ष तुल्यबल्य आहे. याची विरोधकांना जाण आहे म्हणूनच उद्धव ठाकरे निवडणुकीच्या सहा महिन्या अगोदर रायगड मधे सभा घेत आहेत कोलाड  सारख्या नाक्यावर रायगड जिल्ह्यात कोलाड मध्ये संभाजी महाराजांचे स्मारक उभे राहत आहे त्यामुळे परिसराला खूप मोठे महत्त्व प्राप्त होणार आहे केवळ 48 तासात एक भव्यदिव्य असा मेळावा कार्यकर्त्यांनी करून दाखविला यावरून पक्षाची ताकद काय आहे हे दिसून आले 

    अनंत गीते म्हणाले की सुनील तटकरे आता उभे राहण्याचे धाडस करणार नाही मी कुठे धाडस केलं नाही असं माझ्या जीवनात कधी झालं नाही असा टोला अनंत गीते यांना लगावला महायुतीच्या माध्यमातून आपल्याला  उमेदवारी मिळेल हे निश्चित असून कार्यकर्त्यांनी कामाला लागा असे आवाहन त्यांनी केले.तर याप्रसंगी आमदार अनिकेत तटकरे म्हणाले की तटकरे साहेबांवर एवढे प्रेम आहे की लोक आम्हाला फोन  करुन सांगतात की साहेब जिथे  असतील तिथे आम्ही राहू. नाना नाणी पार्क ची दुरावस्था झाली काही गैरप्रकार होऊ लागले परंतु यापुढे संभाजी महाराजांचे महाराजांचे स्मारक या ठिकाणी उभे करण्याचा निर्णय घेतला जेणेकरून या वस्तूचे पावित्र्य जपले जाईल शिवप्रेमी त्याची जतन करतील असे अनिकेत म्हणाले.

    मला मंत्रीपदाच्या काळात रायगड साठी 50 कोटी निधी आणता आला संभाजी स्मारक हे भव्य दिव्य असे होईल व शिवप्रेमी पर्यटक या भागाला भेट देतील असे स्मारक उभे राहील असा विश्वास अदिती तटकरे यांनी व्यक्त केला तर आजचा नाका हा खूप बदललेला आहे अण्णांची विधानसभेत जाण्याची जी इच्छा होती ती तुमच्या आशीर्वादातून आम्हाला नेतृत्व देऊन पूर्ण केलीत म्हणून यापुढे ज्या पद्धतीने 2014 चा वचपा 2019 ला काढला तसेच 2024 ला विक्रमी मते द्या या भागातून दहा हजार मतांचे लीड द्या असे आव्हान  महिला बाल विकास मंत्री आदिती ताई तटकरे यांनी कार्यकर्त्यांना केले.

  प्रास्ताविक गणेश घोणे  सर तर आभार जगन्नाथ धनवडे यांनी केले

        तर गेली पाच वर्षात ज्या पद्धतीमध्ये या भागात जो विकास झाला त्याची पोचपावती मतदार निश्चितच देणार असल्याचे असल्याचे भव्यदिव्य मेळ्याव्यातून दिसून आले.

Comments

Popular posts from this blog