मेढा येथील रायगड भूषण पत्रकार उदय मोरे यांचे दुःखद निधन


रोहा- शैलेश गावंड 

     रोहा तालुक्यामधील मेढा गावातील ज्येष्ठ पत्रकार उदय दत्तात्रय मोरे यांचे ७ मार्च रोजी निधन झाल्याचे समजले सर्वांसाठीच ती एक धक्का दायक बातमी होती पत्रकारितेमधील एक तळपता तारा फार लवकर वयाच्या 56 व्या वर्षी सोडून गेला त्याबद्दल सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे उदय माझा पूर्वीपासून मित्र होता १९९३ पासून त्याने पत्रकारितेला सुरुवात केली मी तेव्हा मेढ्यामध्येच राहत होतो आम्ही काही काळ शेजारीच राहत होतो त्याने विविध लेख स्पर्धा कविता स्पर्धेच्या माध्यमातून माझ्यामध्ये लेखनाची गोडी निर्माण केली आणि मला पत्रकारिता या क्षेत्रामध्ये आणले 

       उदय मोरे यांचे सामाजिक आणि राजकीय क्षेत्र खूप मोठे होते पत्रकारिता सांभाळून त्याने विविध राजकीय पक्षांमध्ये काम केले तसेच विविध सामाजिक संस्थांमध्ये पदाधिकारी राहून चांगले कार्य केले पत्रकारितेमध्ये त्यांनी अनेक समस्या यशस्वीरित्या हाताळल्या तसेच त्याने खूप सारे विविध पुरस्कार सुद्धा मिळविले पत्रकारितेमधील एक उमदे खेळकर हसरे व्यक्तिमत्व म्हणून त्याची ओळख होती कॉलेज जीवनात त्याने विविध कला क्रीडा स्पर्धा मधून अनेक पारितोषिक मिळवली तसेच त्यांनी सुरुवातीला विविध मार्केटिंग कंपनीमध्ये तसेच धाटाव एमआयडीसी मधील कंपनीमध्ये काम केले,बीकॉम एलएलबी पर्यंत शिक्षण पूर्ण केले, पत्रकारिता तसेच विविध सामाजिक संघटनेच्या माध्यमातून त्याच्या यशाचा आलेख चढताच राहिला रायगड भूषण हा २०१५/१६ चा मानाचा पुरस्कार त्यांना मिळाला आणि मेढा गावची शान वाढली ग्रामपंचायतचे उपसरपंच पद सुद्धा त्याने भूषवले होते आणि ग्रामपंचायतच्या माध्यमातून ग्रामस्थांना विविध शासकीय योजनांची माहिती करून देणे, तसेच विविध विकास कामांचा पाठपुरावा करण्यासाठी प्रयत्न केले होते केवळ रोहा तालुक्यातच नव्हे तर जिल्हा भरात त्याचा जनसंपर्क होता विविध पक्षांचे राजकीय नेते व्यापारी व मान्यवर नागरिक यांच्याशी त्यांचे चांगले संबंध होते त्याच्या आकस्मित जाण्याने न भरून निघणारी पोकळी निर्माण झाली आहे ते अनेक सामाजिक संघटनांवर पदाधिकारी होते त्यांची लिस्ट एवढी आहे की त्या नावानेच हा लेख भरून जाईल त्यामुळे काही मोजकेच संस्थांची नावे इथे देतो

महाराष्ट्र शासनाचा विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून सलग तीन वेळा निवड, मा. उपाध्यक्ष कुणबी समाजोन्नती संघ मुंबई तालुका रोहा,  रोहा तालुका प्रेस क्लब अध्यक्ष, जय भवानी ग्रामीण बिगर सहकारी शेती पतसंस्था भुवनेश्वर मर्यादित वीस वर्षे संचालक सचिव, को ए सो मेढा हायस्कूल चे संचालक , प्रेमचंद नागाजी विद्यामंदिर मेढा चे विश्वस्त, रोहा तालुका शांतता समिती सदस्य, महात्मा गांधी तंटामुक्ती गाव समिती सदस्य अवचित गड प्रतिष्ठान अध्यक्ष विभागीय अध्यक्ष रायगड प्रेस क्लब तसेच त्यावेळी मी स्थापन केलेल्या मेढा साहित्य कला मंडळचा सचिव म्हणूनही त्यांनी काम केले होते. अशा अनेक संघटनांवर त्यांनी पदाधिकारी म्हणून यशस्वीरित्या कार्य केले

खूप पुरस्कारही मिळवले त्यातील महत्त्वाचे म्हणजे 2020/21 चा नॅशनल रुरल बेळगाव व हेल्थ अँड नेचर डेव्हलपमेंट सोसायटी कर्नाटक राज्याचा सामाजिक शैक्षणिक सेवा आंतरराज्य गौरव पुरस्कार .1998 /99 चा दर्पण पुरस्कार 2009/ 10 चा रायगड जिल्हा पत्रकार मित्र फाउंडेशन चा प्रभाकर पाटील उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार रायगड जिल्हा प्रेस क्लब व श्रमिक पत्रकार संघाचा प्रभाकर पाटील उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार, स्पंदन नाट्यसंस्थेचा २००८ चा स्नेह पुरस्कार व असे अनेक पुरस्कार मिळाले आहेत

   त्यांनी दैनिक कृषीवल ,सागर, रत्नागिरी टाइम्स, पुढारी, वादळ वारा, लोकमत,सां.रोहा टाइम्स, शिवतेज अशा वृत्तपत्रातून लेखणी चालवली आहे तसेच विविध सामाजिक संघटनांमध्ये काम करत असताना महाराष्ट्र कृषक समाज संघटनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्याचे प्रयत्न केले. मुंबई गोवा चौपदरीकरण आंदोलनात सहभाग ,आदिवासी बांधवांच्या मुलांना शिक्षणासाठी प्रवृत्त करून त्यांना शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न, कोकण रेल्वे प्रकल्पग्रस्ता ंच्या समस्या सोडवण्यासाठी लिखाण केले, अवचित गड प्रतिष्ठान तर्फे गुणवंतांचा व पत्रकारांचा ही सन्मान केला. अशाप्रकारे उदय बद्दल लिहावे तेवढे थोडेच आहे तो युवकांना मार्गदर्शनही करत  असे त्याची एक कायम स्मरणात राहिलेली आठवण सांगावीशी वाटते माझे नाव शैलेंद्र असूनही त्याने मला शैलेश हे टोपण नाव बहाल केले आणि पुढे त्याच नावाने मी परिचित झालो.

    उदय मोरे एक यशस्वी पत्रकार म्हणून अखेरपर्यंत कार्यरत राहिले आणि सोशल मीडियाच्याही माध्यमातून प्रसिद्धीच्या झोतात राहिले.

काही वर्षांपूर्वी मधुमेह या आजाराने त्याला घेरले तरीही न डगमगता त्याने खूप काळ यशस्वी झुंज दिली पण अखेर काळाने अचानक झडप घातलीच आणि पत्रकारीते मध्ये तळपणाऱ्या उदय नावाच्या सूर्याचा आकस्मिक दुःखद अस्त झाला मेढा ग्रामस्थ, शाळेतील शिक्षक ,विद्यार्थी , पतसंस्था सदस्य,आणि अनेक मान्यवरांनी दुःख व्यक्त करून शोक संदेश दिला त्याच्या पश्चात पत्नी मुले आई,भाऊ असे मोठे कुटुंब आहे

दशक्रिया विधी दिनांक १६ मार्च रोजी मेढा वाकेश्वर तलावाजवळ होणार आहे तसेच उत्तरक्रिया तेरावे १९ मार्च रोजी राहत्या घरी होणार आहे. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो ही माझ्या सह सर्व पत्रकार मित्रा तर्फे तसेच रायगड जिल्हा पत्रकार मित्र फाउंडेशन तर्फे तसेच अन्य सर्व पत्रकार संघटना तर्फे उदय मोरे यांना भावपूर्ण श्रद्धांजली !

Comments

Popular posts from this blog