सुदर्शन केमिकल इंडस्ट्रीज लिमिटेड अंतर्गत वरसे येथे "सुसंवाद प्रशिक्षण कार्यशाळा" संपन्न 


रोहा प्रतिनिधी 



                मंगळवार दि.23.01.2024 रोजी सुदर्शन केमिकल इंडस्ट्रीज लिमिटेड अंतर्गत CSR Head सौ.माधुरी सणस यांच्या मार्गदर्शनाखाली  महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नोती अभियान ,पंचायत समिती रोहा यांच्या सहकार्यातून वरसे या ठिकाणी रोहा तालुक्यातील सर्व CRP , महिला बचत गटाचे अध्यक्ष, सचिव, सदस्य यांच्यासाठी  "सुसंवाद प्रशिक्षण कार्यशाळा"  हा मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.कार्यक्रम दरम्यान लेखक, सुपरिचित सामाजिक कार्यकर्ते, व्यसनमुक्ती प्रेरणा संवर्धन तज्ञ श्री.किशोर काळोखे यांनी समजुतदार, सहनशीलता, सुसंवाद ,समुदाय संवाद,ताणतणाव मुक्त या विषयी मार्गदर्शन केले.तसेच सदर कार्यक्रमास रोहा तालुक्यातील सर्व CRP  व महिला बचत गट,प्रभाग संघ,ग्रामसंघ चे अध्यक्ष, सचिव आणि सदस्य असे एकुण  110 महीला उपस्थिती होत्या. दरम्यान महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोनती अभियान ,रोहा पंचायत समिती चे पदाधिकारी श्री.अक्षय खंदारे ,श्री.रविंद्र राठोड,नेहा पाटील मॅडम तसेच  सुदर्शन केमिकल  इंडस्ट्रीज लिमिटेड CSR विभागाचे Sr.Executive श्री.चेतन चौधरी उपस्थित होते.


कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन श्री.अमर चांदणे यांनी केले.

Comments

Popular posts from this blog