आदर्श वाली ग्रामपंचायत येथे प्रजासत्ताक दिनानिमित्ताने विविध कार्यक्रम संपन्न


रोहा प्रतिनिधी 


       आदर्श वाली ग्रामपंचायत येथे प्रजासत्ताक दिनानिमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. 26 जानेवारी रोजी सकाळी ग्रामपंचायत येथे ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर अकरा वाजता हळदी कुंकू कार्यक्रम सौ.वरदा सुनील तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत साजरा झाला. या कार्यक्रमाला महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.


     आदर्श ग्रुप ग्रामपंचायत वालीचे सरपंच श्री उद्देश जनार्दन देवघरकर यांनी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते. यामध्ये महिलांना व्यवसायासाठी साहित्य वाटप, प्राथमिक शाळा वाली येथे साहित्य वाटप, अंगणवाडीसाठी साहित्य वाटप, टेबल, खुर्ची, फिल्टर वाटप,ओला सुका कचरा व्यवस्थापन करण्यासाठी डस्टबिन वाटप करण्यात आले आहे. 


     प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून आदर्श वाली ग्रामपंचायतचे सरपंच उद्देश देवघरकर यांनी उपयोगी अशा वस्तूंचे वाटप केले. सर्व महिला वर्गाकडून तसेच शाळा व्यवस्थापनाकडून अशा सर्व स्तरातून त्यांचे कौतुकव आभार मानले. सौ.वरदा तटकरे यांच्या हस्ते सर्व वस्तूंचे वाटप करण्यात आले.


          या कार्यक्रमास वरदा तटकरे, महिला अध्यक्ष प्रितम पाटील, उपसरपंच विठोबा भोस्तेकर, माजी उपसरपंच लीलाधर बुर्टे, अस्मिता तावडे, प्राची पवार, स्नेहा शिर्के, प्रिया उंडे, कश्मीरा बुर्टे,गंगाराम बुर्टे,पार्वती खेराडे, ग्रामसेविका प्रिया कुंडे आदीं मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व सदस्य,महिला मंडळ, ग्रामस्थ मंडळ, मुंबई मंडळ, तरुण मित्र मंडळ यांनी परिश्रम घेतले.

Comments

Popular posts from this blog