इमारत नुतनीकरणांने एक चांगले स्थित्यंतर घडले आहे, पोलिस अधिक्षक-सोमनाथ घार्गे


तळा-किशोर पितळे

          श्री जनजागृती शिक्षण प्रसारक मंडळाचे ज्ञानदीप माध्यमिक विद्यालयाचे नुतनीकरण उद्घाटन जिल्हा पोलिस अधिक्षक मा.सोमनाथ घार्गे  यांच्या शुभहस्ते २३ जाने.२४ रोजी सकाळी ११.३० वा. करण्यात आले.यावेळी व्यासपिठावर समाजसेवक तथा रायगड भुषण कृष्णा महाडीक चेअरमन यशवंत मोंढे, संस्था अध्यक्ष दिपक रसाळ,मुख्याध्यापिका श्रीम. किरण चव्हाण प्रसिध्द उद्योजक मंदार शर्मा सचीव मनोहर काप,उप विभागीय पोलीस अधिकारी नितीन पोंदकुळे, उपशिक्षणाधिकारी (माध्य.) सुनिता पालकर उपस्थित होते. यावेळी उद्घाटनपर भाषणात संबोधित करताना म्हणाले कि डाॅ. आंबेडकर म्हणतात शिक्षण घ्या संघटीत रहा संघर्ष करा,मोठे व्हा.संघर्ष वाईट गोष्टींचा करा.शिक्षणाने प्रगती होते. विद्यार्थांनी पुढील धेय्य निश्चित करा. पालकांनी मुलांचे मनोबल खचू देवू नका.वेगवेगळ्या क्षेत्रात नावीन्य मिळू शकते. संघर्ष वाईट गोष्टीसाठी करा. ज्या शाळेने घडवले मोठे केले तिला विसरू नका. माझ्या सातारा जिल्ह्यातील प्राथमिक शाळेत शिकलो शिक्षण घेतले मोठा झालो. गावी गेलो का आवश्यक भेट देतो.माझी शाळा जिल्ह्यातील पहिल्या पाच मध्ये आहे.शाळा उभी करताना वडिलांसह अनेकांनी मदत करुन उभी केली. आज याच शाळेचे रोपटे वाढून भव्य अशी ही शाळा झाली आहे.आजच्या घडीला एकूण ५ क्लास वन अधिकारी, १० डॉक्टर,५० पेक्षा जास्त इंजिनिअर,१०० पेक्षा जास्त वकील व इतर ठिकाणी असे चांगले विद्यार्थी शिकले आहेत. सांगण्याचा उद्देश एवढंच की शाळा ही एक ज्ञान मंदिर आहे. आपल्याला काय पाणी घालत घालत त्याला मोठ कराव लागत समृध्द कराव लागत हे स्थित्यंतर बोरघर हवेली माध्यमिक शाळेत मदत करायची झाली तर शाळेला करतो.पण मंदिराला करीत नाही.ते इतरांच्या मदतीने होते. मदत ही ज्ञान मंदिराला करा अनेक पिढ्या शिक्षण घेत असतात.असे मौलीक मार्गदर्शन केले.समाजसेवक कृष्णा महाडीक म्हणाले की हायस्कूलच्या नुतनीकरणाचा प्रस्ताव आल्यावर प्रत्यक्ष पाहणी करुन ज्ञान मंदीराची  झालेली दुरावस्था चक्री वादळाने हानी झाली होती. विद्यार्थांना कुठे वर्ग भरायचे प्रश्र होता. मी आपल्या शाळेसाठी रोटरी क्लब नरिमन पाॅईट व उद्योजक मंदार शर्मा यांच्याकडे शब्द टाकला आणि लगेचच या दानशुर व्यक्तींनी मदतीचा हात पुढे करून नुतनीकरण होऊन उद्घाटन झाले मी मात्र माध्यम आहे. 

          देशाला मोठे करायचे असेल तर ग्रामीण भागातील शिक्षण, पाणी, आरोग्याने समृध्द करा-हि प्रगती आहे. दान सत्पात्री असावे. मी २१ शाळांचे नुतनीकरण केले.दान करणारे उत्तर भारतीय उद्योजक गुजराती,मारवाडी आहेत. जातपात मानू नका.पहिले दान शिक्षणाला द्या.पालकांनी मुलांची कुवत लक्षात घेऊन शिक्षण द्यावे.वेगवेगळ्या क्षेत्रात नावीन्य मिळू शकते.विद्यार्थांनी पुढील वर्षाचे धेय्य अगोदरच निश्चित करा.शाळेने घडवले मोठे केले तिला विसरू नका. तीचे ऋण शाळेला मदतीचा हात देऊन फेडा असे आवाहन केले. शिक्षण घ्या मोठे व्हा. शिक्षणाने प्रगती होते शिक्षण ज्या शाळेत घेतले तीचे नांव आईवडिलांचे गांव, नांव मोठे करा.ज्या मुलांना उच्चशिक्षण घेण्याची इच्छा असेल त्यांनी कोणाची तरी मदत घ्या मी सहकार्य करेन असे मंदार शर्मा यांनी सांगीतले.या कार्यक्रमाचे प्रास्ताविकात यशवंत मोंढे यांनी २७वर्षातील प्रगतीचाआलेख विषद केला रायगड भूषणकृष्णा महाडिक यांचेप्रयत्नांतून अनेकशाळांच्या इमारती,शौचालये पाणी व्यवस्थाअशा सुविधा अनेक शाळांमधे पुरविण्यात आल्या आहेत. आज त्यांचेच प्रयत्नांतून बोरघर हवेली या २१ व्या शाळेत इमारत नुतनीकरण व इतर सुविधा पुरवून विद्यार्थ्यांच्या शिक्षणात एक आनंद मिळवून दिला आहे.अतिथी उद्योजक मंदार शर्मा यांच्या योगदानातून चांगल्या वर्गखोल्या इमारत झाली आहे.संस्था सदैव ऋणी राहील.यावेळी उपाध्यक्ष कानू विचारे, खजिनदार पांडुरंग माळी, सहसचिव नाना दळवी,सदस्य आनंद माळी,गणेश काप रामदास मोरे सर्व संस्थापक सदस्य, पदाधिकारी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी,तळा पोलीस निरीक्षक गणेश कराड,पालक,आजी माजी विद्यार्थी, पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन पालकर सर यांनी केले.

Comments

Popular posts from this blog