अयोध्येतील राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त तळा येथे भव्य शोभायात्रा 


तळा-किशोर पितळे

         अयोध्या येथील श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्ताने संपूर्ण देशात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. त्याचाच एक भाग म्हणून तालुक्यासह तळा शहरात श्रीराम प्राण प्रतिष्ठापना निमित्ताने भव्यशोभा यात्रेचे सकल हिंदू समाज संघटनेने आयोजन करण्यात आले होते. या शोभा यात्रेेत तळा प्राथमिक मुलांची शाळेतील विद्यार्थ्यांनी व तळा हायस्कूल मधील विद्यार्थ्यांनी श्रीराम लक्ष्मण सीता हनुमानाची व शबरीची विविध वेशभूषा करून श्री राम पंचायतन अवतरल्याचे नयनरम्य दृष्य विषेश आकर्षण ठरून शहरातील सर्वांचे लक्ष वेधले.जवळ जवळ पाचशे वर्षांनी आयोध्या येथे मूळ स्थानी श्रीरामाची बालमूर्ती प्राणप्रतिष्ठा होत असल्याने संपूर्ण देशात सर्वत्र शोभा यात्रा काढण्यात आल्या. श्री राम वेशभूषा, घरोघरी श्रीराम ध्वज, पताका, लाइटिंग ठीक ठिकाणी रांगोळी,स्वच्छता, रंगरंगोटी काढून एक नवचैतन्य भक्तीमय वातावरण निर्माण झालेहोते. सायं. ४ वा शोभा यात्रा मधली ब्राह्मण आळी, मारुती मंदिर येथून काढून बळीचा नाका,एस टी स्टॅन्ड, नगरपंचायत नाका,श्रीराम चौक व पुढे पुरातन श्री राम मंदिर कुरुंडा येथे महाआरती करून समारोप करण्यात आला.या शोभा यात्रेत सकल हिंदू धर्मीय भाविक सहभागी होते मिरवणुकीचे ठिक ठिकाणी पुष्पवृष्ठी करीत स्वागत केले जात होते. या मिरवणुकीत महिला,लहान मुले, यांच्यासह ज्येष्ठनागरिक सहभागी झाले होते महिला,तरुण,युवक,युवती, तरुणाईने चांगलाच नृत्याचा ठेका धरीत प्रभू रामाच्या जयघोष करीत व लाठी काठी खेळ करीत आपला आनंद व्यक्त केला. श्रीराम मंदिरे व इतर मंदिरे सजवण्यात आली होती.                        ग्रामीण भागात साफ सफाई, स्वच्छता, रंगरंगोटी, लाइटिंग करून गावां मध्ये मिरवणुका काढून पारंपारीक वाद्य ढोल,ताशा व फटाक्याच्या आतिषबाजीत भजन करीत शोभा यात्रा काढून आनंद व्यक्त केला तर काही ठिकाणी श्रीरामाची पालखी मिरवणूक काढण्यात आली.व प्रत्येकाच्या घरोघरी दर्शनासाठी नेण्यात आली होती. सांय.७‌ वा.घरोघरी दिप प्रज्वलीत करुन व आकाश कंदील लावून श्रीराम दिवाळी साजरी केली. यामध्ये सर्व ग्रामस्थ सहभागी झाले होते.संपुर्ण. तालुका भक्तीमय वातावरणात मोठ्या उत्साहात पावित्र्य राखीत, शांतता व एकात्मतेचे दर्शन घडवून आनंद सोहळा साजरा केला.

Comments

Popular posts from this blog