कु.परमेश्वरी (परी) वेदक जर्मन लिपीत देशात पहिली.गो.म.वेदक तळा हायस्कूलचे नांव उंचावले


तळा-किशोर पितळे

           तळा तालुक्यातील गो.म.वेदक विद्यामंदिर ची विद्यार्थीनी कु. परमेश्वरी (परी)प्रशांत वेदक हि इ.९वीत शिक्षण घेणारी असून इयत्ता ८वी त असताना जर्मन लेव्हल २ फाॅरेन लॅग्वेज ऑनलाईन परीक्षा डिसेंबर २०२२मध्ये घेण्यात आली. या परिक्षेचा निकाल लागला तेव्हा जिल्ह्यात प्रथम, राज्यात तिसरा तर देशात चौथ्या क्रमाकांने उत्तीर्ण होऊ त्या परीक्षेत ५० पैकी ४५ मार्क मिळवले होते. या यशामागे सातत्याने शिकण्याची जिद्द धरली होती ऑन लाईन ट्युशन काॅरस्पाडींग करून यश मिळवले आहे. यंदा जर्मन भाषा लेव्हल १ व जर्मन भाषा लेव्हल २ हि आणि यंदा फाॅरेन लॅग्वेज ऑनलाईन ऍक्सझाम नं.३मध्ये ५० मिळवून यशस्वीरित्या पास झाली असून जिल्हा,राज्य,व देश पातळीवर प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण होऊन शाळेचे,गावाचे नांव, घराण्याचे नांव उंचावले असल्याने तिचे सर्व स्तरावरुन अभिनंदन केले जात आहे.कु.परी  शाळेत पहिल्या क्रमांकावर असून प्रेमळ,नम्र,मेहनती अशी असून कोणतेही क्लास न घेता स्वत: अभ्यास करुन मेहनतीवर यश संपादन केले आहे.सुवर्णपदक प्राप्त केले वडीलांची आर्थीक परिस्थिती नाजूक असून आई वडीलांच्या संस्कारातून शिक्षणा साठी प्राधान्य देत फाॅरेन लॅग्वेजला महत्व देत ऑनलाईन अभ्यास केला पहिल्या वेळेला मिळवलेल्या यशाने स्फूर्ती मिळाली आणि पुढील अभ्यासात लक्ष केंद्रीत केले. शालेय अभ्यास देखील नियमीतपणे करून वक्तृत्व, रांगोळी, चित्रकला असे छंद जोपासत असून मोबाईलच्या विश्वात असुन हि त्याच्या आहारी न जाता योग्य वापर करीत आहे.या सगुणा मधून परमेश्वरीच्या प्रगतीचा आलेख वाढता आहे.तिचे जवळ प्रतिनिधीनी संपर्क साधला असता तीने सांगीतले की फाॅरेन लॅग्वेज चे देशात नोकरीसाठी अनन्य साधारण महत्व असून चांगल्या कंपनीत भारतीय सेवेत देखील नोकरीची चांगली संधी असते. पाश्चिमात्य देश आपल्या भाषा शिक्षणासाठी येतात मग आपण अशा भाषेचे ज्ञान का घेऊ नये. याचा विचार करून मी भाषा अवगत करीत आहे.

            भविष्यात उच्च माध्यमिक शिक्षण पुर्ण करून महाराष्ट्र लोकसेवा आयोग अर्थात(एम.पी.एस.सी) केंद्रीय लोक सेवा आयोग(यु.पी.एस.सी) स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करुन कलेक्टर सारख्या उच्च पदावर सेवा करण्याची ईच्छा व्यक्त केली.अशा या मुलीच्या जिद्दीचा आत्मविश्वासाचा आदर्श इतर मुला/मुलींनी घेण्यात सारखा आहे. परमेश्वरीचे समाजा कडून कुटुंबियाकडून शाळेकडून सर्व स्तरावरुन अभिनंदन केले जात आहे.

Comments

Popular posts from this blog