नवनियुक्त सहा.पोलीस निरीक्षक गणेश कराड यांचे तळा प्रेस कडून स्वागत
तळा -किशोर पितळे
तळा पोलीस ठाण्याचे नवनियुक्त सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश कराड यांची २ जाने. २४ रोजी तळा येथे नियुक्ती झाली आहे. कैलास डोंगरे यांची बदली झाल्यामुळे गणेश कराड यांची खालापूर पोलीस ठाण्यातून सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणून नियुक्ती झाली आहे. गणेश कराड सन २०१० च्या बॅचचे सहा.पोलिस निरीक्षक पदी दंगल नक्षलवादी भागातील गडचिरोली जिल्ह्यात झाली. त्यावेळी त्यांनी ३ वर्षात अनेक गुन्हेगार त्याच बरोबर नक्षलवाद्यांचा खात्मा केला होता.त्यांचे उत्कृष्ट कामगिरी बद्दल तत्कालीन गृहमंत्री कै.आर आर पाटील यांच्या हस्ते सन्मानीत करण्यात आलं होतं. त्यानंतर नवी मुंबई रायगड खोपोली खालापूर येथे काम केले आहे गणेश खराडे यांनी पदभार स्वीकारल्या नंतर तळा प्रेस क्लबच्या पदाधिकाऱ्यांनी स्वागत केले. शाल पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करून पुढील काळासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या. यावेळी पत्रकारांशी संवाद करताना सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश कराड यांनी पदभार स्वीकारताच बंद घरातील घर फोडीतील आरोपीला अवघ्या २४ तासात मुंबईतून पकडून अटक केली. तळा पोलिस ठाण्यातील कायदा सुव्यवस्था राखताना शहरातील वाहतूक कोंडी स्थानिक प्रशासन,अन्य समस्या,व्यापारी,नागरिक पत्रकारयांच्या सहकार्यातून समस्या सोडवल्या जातील, तसेच नागरिकांच्या तक्रारी महिलांची छेडछाड व अन्य कुठली अवैध धंदे असतील तर त्यावर निश्चितच नागरिकांनी थेट आमच्याकडे तक्रारी कराव्यात त्याची दखल घेवुन कडक कारवाई केली जाईल असे सांगितले.
यावेळी तळा प्रेसचे अध्यक्ष संजय रिकामे, उपाध्यक्ष किशोर पितळे,सचिव आंबेगाव सर ज्येष्ठ मार्गदर्शक पुरुषोत्तम मुळे, विराज टिळक ,नझीर पठाण,सुरेंद्र शेलार व संध्या पिंगळे उपस्थित होते.
Comments
Post a Comment