"माझे कुटुंब माझी पेन्शन "मागणीसाठी तळा तहसीलदार कार्यालयात कर्मचारी आंदोलनतळा-किशोर पितळे

             आज दि. ०८/११/२०२३ रोजी राज्य सरकारी कर्मचारी संघटनेने जुनी पेन्शन लागू करावी या मुख्य मागणीसह इतर १५ प्रलंबित मागण्यांसाठी सहकुटुंब मोर्चाचे आयोजन केले होते. हा मोर्चा तळा शहर बाजारपेठ तहसील कार्यालयापर्यंत असा काढण्यात आला.आपल्या प्रमुख मागण्यांसाठी दि.१४ मार्च २०२३ ते २० मार्च २०२३ ह्या कालावधीत संप पुकारण्यात आला होता. त्यावेळी सरकारने दिलेल्या आश्वासनांवर विश्वास ठेवून हा संप २० मार्च ,२०२३ रोजी मागे घेण्यात आला होता.परंतु आज सहा महिन्यांचा कालावधी उलटूनही सरकारने आपली आश्वासने पाळली नाहीत. म्हणून हा मोर्चा आयोजित करण्यात आला होता. सरकारने,संघटनेने मांडलेल्या मागण्या तात्काळ पूर्ण न केल्यास राज्यभरातील सरकारी कर्मचारी व शिक्षक व शिक्षकेतर, जि.प. व निमसरकारी व कंत्राटी कर्मचारी १४ डिसें.२०२३ पासून बेमुदत संपावर जातील.असा इशारा आज जमलेल्या सहकुटुंब जमावा समोर करण्यात आला आहे.नवीन पेन्शन योजनेप्रमाणे गेली १७ वर्षे राज्यातील कर्मचारी शिक्षक नाडले गेले आहेत. सेवानिवृतीनंतर त्यांचे भवितव्य उध्दवस्त झालेआहे. त्यामुळे जुनी पेन्शन योजना (ओ.पी.एस) सर्वांना लागू करा.या प्रमुख मागणीसह कंत्राटी भरती पध्दत बंद करा.कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम करा.अशा आपल्या न्याय व हक्कांसाठी घोषणा बाजी करीत हा मोर्चा तहसील कार्यालयात पोहोचला.सदर मोर्चाचे समारोप सभेत होऊन मागणी निवेदन मा. तहसीलदार साहेबा तळा यांना देण्यात आले. या मोर्चात तळा मध्यवर्ती कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी, शिक्षक संघटना, निमसरकारी कर्मचारी संघटना,सर्व सहकारी आपल्या कुटुंबासहित मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog