खारगाव ग्राम पंचायतीवर राष्ट्रवादी चे थेट सरपंच दत्तात्रेय काळे यांची सर्वाधिक मताधिक्याने निवड..



राष्ट्रवादी सरपंच सहित ६, शिवसेना (शिंदे गट) २, शेकाप १ आणि अपक्ष १.



खारी /रोहा (केशव म्हस्के)०७ नोव्हें:- 

        रविवार दि.५ नोव्हेंबर रोजी पार पडलेल्या १२ ग्राम पंचायतींच्या निकाल हाती येताच राजकीय दृष्ट्या प्रतिष्ठेची व तालुक्यातील बहुचर्चित खारगाव ग्राम पंचायत सार्वत्रिक निवडणूक दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे थेट सरपंच म्हणून दत्तात्रेय चिमाजी काळे यांच्या रूपाने सर्वाधिक मताधिक्य मिळवून विजयी संपादित करीत खारगाव ग्राम पंचायतीवर पुन्हा राष्ट्रवादीचे( सरपंच पदाचे) वर्चस्व प्रस्थापित करत गड अबाधित ठेवण्यात मोठे यश मिळविले आहे..


       तालुक्यातील सर्वच राजकीय पक्षांनी प्रतिष्ठेची मानलेली खारगाव ग्रूप ग्राम पंचायत म्हणजे खारी - काजुवाडी गुरूनगर,गौळवाडी तारेघर ही महत्वाची गावे आदिवासी वाड्या वस्त्या या प्रामुख्याने रोहा माणगाव - श्रीवर्धन विधान सभा मतदार संघामध्ये येतात तर  मौजे खारगाव हद्दीतील  गावे आदिवासी वाड्या वस्त्या या मुरुड - अलिबाग विधान सभा मतदार संघामध्ये विभागल्याने येथे दस्तुर खुद्द खासदार सुनिल तटकरे,नामदार अदिती  तटकरे,आ.अनिकेत तटकरे यांचे बाले किल्ला तर मुरुड - अलिबाग विधान सभा शेकाप चे सर्वेसर्वा आ.जयंत पाटील,आ.पंडित शेठ पाटील आणि शिवसेना शिंदे गटाचे आ.महेंद्र शेठ दळवी यांनी प्रतिष्ठेची केल्याने तिरंगी लढत पाहण्यास मिळाली संपूर्ण निवडणूक प्रक्रियेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अगोदरच ५ ग्राम पंचायत सदस्य बिन विरोध निवडून आणण्यात मोठे यश मिळविल्याने कार्यकर्त्यांचा विश्वास बळवला त्याचीच परिणती म्हणून थेट सरपंच पदाचे उमेदवार दत्तात्रेय चिमाजी काळे यांनी सर्वाधिक ९९० मतांचे मताधिक्य घेत २३३९/१९१० असे समीकरण जुळवत निवडणूक पूर्व बिनविरोध निवडून आलेले सदस्य प्रभाग क्रमांक ४ रोहिणी रोहिदास शिर्के,रामदास रामचंद्र दळवी,राजेंद्री बबन वारगुडे,आणि प्रभाग क्र.१ चे नयना नवनीत सावंत,चिमा आत्माराम  ढुमणे तर सार्वत्रिक निवडणुकीमध्ये निवडून आलेले उमेदवार प्रभाग क्रमांक ३ सदस्य सतेज चंद्रकांत आपणकर,विमल मंगेश जगताप,शिवसेना शिंदे गटाने खारगाव प्रभाग क्रमांक १ विकास रामचंद्र पाटील आणि प्रभाग क्रमांक २ मोहन आत्माराम धासडे हे दोन सदस्य पहिल्याच वेळेत दमदार इंट्री करत विजय झाल्याने आ.महेंद्र दळवी यांचा करिश्मा चालला असून पहिल्यांदाच खाता खोलल्याने पक्ष श्रेष्ठींनी समाधान व्यक्त केले आहे तर खारगाव वर शेकाप चे वर्चस्व असताना देखील प्रभाग क्रमांक २ शिल्पा पाटील रूपाने एका सदस्यावर समाधान मानावे लागले तर  प्रभाग क्रमांक ३ अपक्ष म्हणून तारेघर  म्हणून बायजा मातेरे यांनी एकेरी लढत देत विजय संपादन केले..

   ग्रुप ग्रामपंचायत खारगाव सार्वत्रिक निवडणूक २०२३ थेट सरपंच पदाचे दत्तात्रेय चिमाजी काळे यांच्या सह सर्व विजयी उमेदवारांचे खासदार सुनील तटकरे, ना.आदिती तटकरे कॅबिनेट मंत्री (महाराष्ट्र राज्य)दमदार आमदार अनिकेत तटकरे, जिल्हाध्यक्ष मधुकर पाटील,सरचिटणीस विजय मोरे,तालुकाध्यक्ष विनोद पाशिलकर आदींसह तालुक्यातील सर्वच राष्ट्रवादीच्या प्रमुख कार्यकर्त्यांनी विजयी उमेदवारांचे अभिनंदन तसेच प्रचार प्रसार दरम्यान खारी - काजुवाडी गौळवाडीतील तरुण मतदारांचे,कार्यकर्त्यांनी केलेल्या कौतुकास्पद कामगिरी बद्दल आभार व अभिनंदन व्यक्त करून सर्वांना दिपावलीच्या दुहेरी शुभेच्छा देत विजयी उमेदवारांना पुढील उज्वल वाटचालीस शुभेच्छा दिल्या.



      खारगाव ग्राम पंचायत सार्वत्रिक निवडणूक यशश्र्वितेकरिता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी उपसरपंच नितीन मालुसरे,महेंद्र शिर्के,राजेंद्र खिरीट,तंटा मुक्ती अध्यक्ष चंद्रकांत टिकोणे,महादेव मुसळे,महेंद्र खिरीट,समिर म्हस्के, शैलेश खिरीट,महेश कदम,गजानन काळे, प्रफुल्ल खिरीट,सुनिल दळवी,प्रमोद काळे,मनोहर शेळके,विजय दळवी,शशिकांत टिकोणे,दिलीप खिरीट,पांडुरंग टिकोणे,तुकाराम म्हस्के,चंद्रकांत टिकोणे,सुधीर टिकोणे,प्रदिप मनोहर दळवी,हरेश शिर्के,संकेत कदम,मोरेश्वर काळे,सुनील मगर,संतोष दळवी, महादेव म्हस्के,जेष्ठ नागरिक ग्रामस्थ मंडळ,तरुण मित्र मंडळ ,महिला बचत गटांच्या महिला प्रतिनिधी वर्ग आदीसह मुंबई - पुणे - ठाणे येथील आलेले मतदार बांधव सामाजिक,राजकीय विविध क्षेत्रातील कार्यकत्यांनी अहोरात्र अथक परिश्रम घेतले..

 खारगाव ग्राम पंचायत राष्ट्रवादीचे सरपंच पदाचे अधिकृत विजय उमेदवार दत्तात्रेय चिमाजी काळे आप्पा,बिन विरोध निवडून आलेले सदस्य रामदास दळवी,रोहिणी रोहिदास शिर्के सह सर्वच विजय उमेदवारांची कार्यकर्त्यांनी विजयी उत्सव जल्लोषमध्ये भव्य दिव्य मिरवणूक काढून दिवाळी, आनंदोत्सव साजरा करण्यात आला.

 

Comments

Popular posts from this blog