भातसई ग्रामपंचायतीत थेट सरपंच पदाच्या निवडणुकीत योगिता पारधी विजयी होणार राष्ट्रवादी कार्यकर्त्यांचा दावा 


रोहा (शरद जाधव)

        रोहा तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत भातसई मध्ये राष्ट्रवादी पक्षाच्या थेट सरपंच पदाच्या उमेदवार सौ योगिता नामदेव पारधी या विजयी होणार असा दावा राष्ट्रवादी कार्यकर्ते करीत आहे.

       सौ योगिता नामदेव पारधी या उच्चशिक्षित आहेत. बी.एड.चे शिक्षण घेतले आहे. त्यामुळे त्या सरपंच पदाला निश्चितच न्याय देतील. राष्ट्रवादी पक्षाने एक उच्चशिक्षित उमेदवार रिंगणात उभे केल्याने राष्ट्रवादी पक्षाची जमेची बाजू ठरत आहे. त्यामुळे योगिता पारधी या सरपंच पदाच्या निवडणुकीत विजयी होतील असा दावा राष्ट्रवादी कार्यकर्ते करीत आहेत. रोहा तालुक्यातील भातसई  ग्रामपंचायत ही अलिबाग मतदारसंघात येत आहे या ठिकाणी शिवसेनेचे महेंद्र दळवी हे विद्यमान आमदार आहेत गेली अनेक वर्ष भातसई  ग्रामपंचायत शेतकरी कामगार पक्षाच्या ताब्यात आहे. परंतु काही दिवसापूर्वी येथील शेतकरी कामगार पक्षाचे सरपंच गणेश खरविले यांनी शेकापला अखेरचा लाल सलाम करीत महेंद्र दळवी यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना शिंदे गटात प्रवेश केल्याने शेतकरी कामगार पक्षाचा बालेकील्ला ढ़ासलला तरीसुद्धा बचेंगे तो और भी लढेंगे म्हणत शेतकरी कामगार पक्षाने या ठिकाणी थेट सरपंच पदाकरता सौ मंगल महेश पवार यांना निवडणुकीत उतरले आहे तर शिंदे शिवसेना गटाकडून अनिता सुनील पवार या सरपंच पदाकरिता उभ्या आहेत. राष्ट्रवादी,शेकाप व शिवसेना शिंदे गटाने उमेदवार उभे केल्याने तिरंगी लढतीला महत्त्व प्राप्त झाले आहे .असे असले तरी शेतकरी कामगार पक्षाचा ढासललेला बालेकिल्ला व पहिल्यांदाच शिंदे सेनेचा भातसई ग्रामपंचायत निवडणुकीत उतरण्याचा प्रयत्न पाहता राष्ट्रवादी पक्ष हा गेली पाच वर्षांपूर्वी कमी मताने झालेला पराभवाचा वचपा येत्या निवडणुकीत योगिता पारधी यांना विजयी करून भरून काढतील असा विश्वास व्यक्त होत आहे.भातसई ग्रामपंच्यायतीत राष्ट्रवादीला मानणारा वर्ग खुप मोठा आहे व राष्ट्रवादी पक्षाचे जिल्ह्यात खूप मोठे वर्चस्व आहे जिल्ह्याचे खासदार सुनीलजी तटकरे आमदार अनिकेत तटकरे मंत्री आदीती ताई तटकरे राष्ट्रवादी पक्षाच्या माध्यमातून रायगड जिल्ह्यात विकासाची गंगा आणत आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीचे खमके नेतृत्व कार्यकर्त्यांच्या पाठीशी असल्याने भातसई  ग्रामपंचायतीच्या विकासाला निश्चित चालना मिळेल याकरता मतदार बंधू भगिनी राष्ट्रवादीच्या योगिता नामदेव पारधी यांना निवडून आणतील असा विश्वास राष्ट्रवादी पक्षाकडून व्यक्त केला जात आहे.

Comments

Popular posts from this blog