जरांगे पाटील यांच्या समाज लढ्याला पाठिंबा देण्यासाठी शेणवई ग्रामस्थांनी संपूर्ण गावातून काढली शांतता रॅली 



रोहा प्रतिनिधी

 


        

       मराठा समाजाला आरक्षण  या मागणीसाठी जालना जिल्ह्यात मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सुरू केले आहे. त्यांच्या या उपोषणाला समर्थन देण्यासाठी तसेच मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी रोह्यामध्ये मराठा आंदोलकांचे साखळी उपोषण सुरू आहे. 



रोहा तालुक्यातील शेणवई ग्रामस्थांनी साखळी उपोषणाला पाठिंबा दर्शविला.मनोज जरांगे यांच्या समाज लढ्याला पाठिंबा देण्यासाठी कर्तव्य म्हणून ग्रामस्थांच्या वतीने श्री नवनाथ मंदिर पासून संपूर्ण गावातून रॅली काढण्यात आली. ग्रामदैवत सोमजाई मंदिर येथे रॅलीची सांगता केली. महिला, ग्रामस्थ यांनी घोषणा देत आपली मतं देखील व्यक्त केली.या रॅलीमध्ये तरूण, ग्रामस्थ, विशेष म्हणजे महिला वर्ग देखील मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

उद्योजक सुभाषजी देशमुख, उद्योजक महेंद्र पार्टे, सरपंच डाॅ.प्रगती हेंमत देशमुख, शुभम राजेशिर्के,उदयजी देशमुख,विक्रांत देशमुख,अरुण शिर्के,सुबोध देशमुख, निलेश देशमुख, नितीन देशमुख,  तुषार देशमुख,अमोल देशमुख, अनंत शिर्के,गणेश देशमुख, रवी जाधव सर,अनिता अनंत पाशिलकर [ पासलकर ], सविता देशमुख, वैशाली शिर्के आदि मान्यवर उपस्थित होते.


Comments

Popular posts from this blog