कासेवाडी गावचे सुपुत्र अमेरिकेतील उद्योगपती रमेश वाजे यांना मातृ शोकतळा संजय रिकामे

          तळा तालुक्यातील कासेवाडी गावचे सुपुत्र अमेरिकेतील उद्योगपती रमेश वाजे यांच्या मातोश्री रुक्मिणी सखाराम वाजे यांचे शुक्रवारी १७.११.२३ रोजी दुपारी तीनच्या सुमारास दीर्घ आजाराने कांदिवली येथील निवासस्थानी निधन झाले त्या ७८ वर्षाच्या होत्या त्यांच्या पश्चात पती, मुलगा, दोन मुली, नातवंडे आणि पतवंडे असा परिवार आहे.रमेश वाजे यांचे धाकटे बंधू राजू वाजे यांचे २ महिन्यांपूर्वी अकस्मात निधन झाले होते आता त्यांच्या मातोश्री यांचे निधन झाल्यामुळे वाजे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे..                                                                            कै.रुक्मिणी वाजे अत्यंत प्रेमळ मनमिळाऊ व्यक्तिमत्व होते. एका शब्दानेही तिने कुणाला दुखावलं नाही. सर्वांना प्रेम दिले.माझ्या वडिलांच्या सोबत ती सावली सारखी राहिली. तीच आमच्या सर्वांचा आधार होती. मी माझ्या व्यवसायाच्या निमित्त अमेरिकेमध्ये असल्याने चार मुलांची जबाबदारी आईने यशस्वीपणे पार पाडली.माझी आई कडक शिस्तीची आणि प्रेमळ स्वभावाची होती तीने चारही मुलांवर चांगले संस्कार केले म्हणूनच मी अमेरिका सारख्या ठिकाणी स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकलो.दोन महिन्यांपूर्वी मी भारतात आलो होतो तेव्हा तिने माझ्या पाठीवर दोन्ही हात ठेवत मला आणि माझ्या कुटुंबाला आर्शिवाद दिले. तो आशिर्वाद आता कायम आमच्या पाठीशी राहील, अशी भावना उद्योजक रमेश वाजे यांनी केली. 

             कै. रुक्मिणी वाजे यांच्यावर शुक्रवार ( दि. १८ नोव्हेंबर)रोजी सायं ५ वाजता कासेवाडी ता.तळा जि. रायगड या मुळगावी अंत्यसंस्कार करण्यात आले रमेश वाजे यांच्या मातोश्रीच्या निधनाचे वृत्त कळताच अनेकांनी त्यांचे सांत्वन केले.त्यांच्या अंत्ययात्रेला तालुक्यातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते. रुक्मिणी वाजे यांचे दशक्रिया विधी रविवार दिनांक २६.११.२३ रोजी हरिहरेश्वर येथे पार पडणार आहेत तर उत्तर कार्य मंगळवारी  २८.११.२३ रोजी राहत्या घरी कासेवाडी येथे करण्यात येणार आहेत.

Comments

Popular posts from this blog