तळा शहरातून महावितरण कंपनीच्या इलेक्ट्रॉनिक डीपीची  काॅईल चोरीला 



तळा संजय रिकामे

              तळा शहरात अतिशय धक्कादायक घटना घडली आहे.  दिनांक १९/११/२०२३ रोजी रात्रीच्या सुमारास चोरटयांनी चक्क महावितरण कंपनीच्या इलेक्ट्रॉनिक डीपी वर डल्ला मारला आहे. मुख्य म्हणजे इलेक्ट्रॉनिक डीपी तळा  रोहा रस्त्यालगत राममंदिर कडे जाणाऱ्या रस्त्याच्या कडेलाच आहे. इतक्या मुख्य रस्त्यालगत डीपीची चोरी होणे ही अतिशय धक्कादायक बाब आहे. डीपी चालू स्थितीत असताना मुख्य प्रवाह बंद करून त्याच्या आतील धातुच्या तारा चोरटयांनी लंपास केल्या आहेत. जुना डीपी खराब झाल्याने त्या ठिकाणी काही दिवसांपूर्वीच हा नवीन इलेक्ट्रॉनिक डीपी बसविण्यात आला होता अशा प्रकारच्या डीपी चोरीमुळे पोलिस यंत्रणेला अधिक दक्ष राहण्याची गरज आहे. काही दिवसांपूर्वी तळा तालुक्यातील टोकार्डे येथून देखील पाणी योजनेची विद्युत केबल चोरीला गेली होती.                                                                                                      निर्जन ठिकाणी लावलेली इलेक्ट्रॉनिक डीपी चोरट्यांसाठी सॉफ्ट कॉर्नर ठरतात.डिपीमध्ये शेकडो लिटर ऑईल असते रात्रीच्यावेळी डीपी मधील ऑईल आणि धातूच्या कॉईल काढून नेल्या जातात.डिपी मधील धातूच्या कॉईलची भंगारात विक्री केली जाते या कॉईल महागात विकल्या जातात.ऑईल आणि कॉईल विक्रीतून सोप्या पद्धतीने पैसे मिळवण्यासाठी काही चोरटे अशा प्रकारच्या चोऱ्या करतात.वीज चोरी करणे ऑईल कॉईल आणि विजेची साधने चोरीला गेल्यानंतर विद्युत अधिनियम २००३ चे कलम १३५,कलम १३६ अन्वये गुन्हे दाखल केले जातात.यामध्ये सहा महिने ते पाच वर्ष कारावास,१० हजार रुपयांपर्यंत दंड अथवा  दोन्ही शिक्षेची तरतूद आहे.महावितरण कडून इलेक्ट्रॉनिक डीपी संदर्भात तळा पोलिस ठाण्यात लेखी तक्रार दाखल झाली असून  अज्ञातां विरोधात गुन्हा दाखल झाला असल्याचे समजते. चोरट्यांचा शोध घेण्याचे मोठे आवाहन पोलिसां समोर असून याबाबत तपास सुरू केला आहे.

Comments

Popular posts from this blog