आ.अनिकेत तटकरे यांच्या उपस्थिती मध्ये खारी येथे राष्ट्रवादीच्या प्रचाराचा शुभारंभ.
खारगाव ग्रा.पं मध्ये पाच बिनविरोध उमेदवार काढण्यात राष्ट्रवादी पक्षास मोठे यश..
रायगड जिल्हाध्यक्ष मधुकर पाटील तालुकाध्यक्ष विनोद पाशिलकर हस्ते नारळ फुटला...
खारी/रोहा (केशव म्हस्के)
रोहा तालुक्यातील राजकीय दृष्ट्या प्रतिष्ठेची समजली जाणाऱ्या खारगाव ग्रूप ग्राम पंचायत हद्दीतील खारी येथील हनुमान मंदिर सभागृह येथे विधान परिषद सदस्य आमदार अनिकेत तटकरे जिल्हाध्यक्ष मधुकर पाटील तालुकाध्यक्ष विनोद भाऊ पाशिलकर आदी प्रमुख मान्यवरांच्या हस्ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचाराचे नारळ फोडले...
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे थेट सरपंच पदाचे अधिकृत उमेदवार दत्तात्रेय चिमाजी काळे सदस्य प्रभाग क्र.१ चे संदेश झिलू लांबोरे,प्रभाग क्रमांक २ चे रमाकांत एकनाथ पाटील,रुचिता अविनाश धसाडे,प्रभाग क्रमांक ३ चे सतेज चंद्रकांत आपणकर, आशा अशोक मातेरे,विमल मंगेश जगताप तर यावेळी प्रभाग क्र.४ मधील रोहिणी रोहिदास शिर्के,रामदास रामचंद्र दळवी, राजेंद्री बबन वारगुडे,आणि प्रभाग क्र.१ चे नयना नवनीत सावंत, चिमा आत्माराम ढुमणे हे पाच ही उमेदवार बिन विरोध निवडून आलेले सदस्यांचे कार्यसम्राट आमदार अनिकेत तटकरे जिल्हाध्यक्ष मधुकर पाटील तालुकाध्यक्ष विनोद भाऊ पाशिलकर यांच्या हस्ते पुष्प गुच्छ देत अभिनंदन करून पुढील उज्वल वाटचालीस शुभेच्छा देत अधिक जोमाने थेट सरपंच पदाचे उमेदवार दत्तात्रेय काळे व अन्य उमेदवारांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून ताकद बळ द्यावे यानंतर खारगाव ग्राम पंचायत मधील उमेदवारांनी आपल्या शेकडो समर्थकांच्या समवेत प्रभागानुसार प्रत्येक मतदारांच्या घरोघरी जाऊन मतदारांची भेट घेत मतरुपी आशिर्वादाची अपेक्षा व्यक्त केली याप्रचार फेरीत खारी - काजूवाडी गौळवाडी, गुरूनगर, उसर, तळवली तर्फे घोसाळे,झापडी, केलदवाडी, फणसवाडी, तारेघर, खारगाव आदिवासी वाडी विभागातून प्रचाराची आघाडी घेत उत्तम प्रतिसाद मिळत आहे...
यावेळी माजी उपसरपंच नितीन मालुसरे,महेंद्र शिर्के,राजेंद्र खिरीट,तंटा मुक्ती अध्यक्ष चंद्रकांत टिकोणे,महादेव मुसळे,महेंद्र खिरीट,समिर म्हस्के, शैलेश खिरीट,महेश कदम,गजानन काळे, प्रफुल्ल खिरीट, सुनिल दळवी,प्रमोद काळे,मनोहर शेळके,विजय दळवी,शशिकांत टिकोणे आदी कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते...
Caption :- विधान परिषद सदस्य आमदार अनिकेत तटकरे जिल्हाध्यक्ष मधुकर पाटील तालुकाध्यक्ष विनोद भाऊ पाशिलकर,थेट सरपंच पदाचे उमेदवार दत्तात्रेय काळे व अन्य मान्यवर..
छायाचित्र :- केशव म्हस्के (खारी/ रोहा)
Comments
Post a Comment