खासदार सुनिल तटकरे साहेबांनी खारगाव ग्रामपंचायतीचे थेट सरपंच दत्तात्रेय काळे यांचे केले अभिनंदन 


खारी-  केशव म्हस्के 

       कोकणचे विकास पुरुष रायगड लोकसभा सदस्य  लोकप्रिय खा.सुनिल तटकरे साहेबांनी खारगाव ग्रा.पं.चे थेट सरपंच दत्तात्रेय चिमाजी काळे आणि नवनिर्वाचित उपसरपंच रामदास रामचंद्र दळवी यांचे अभिनंदन करून पुढील उज्वल वाटचालीस भरभरून शुभेच्छा दिल्या.

    यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा अध्यक्ष मधुकर पाटील,रायगड जिल्हा सरचिटणीस विजय मोरे,रोहा तालुकाध्यक्ष विनोद भाऊ पाशिलकर,सर्व ग्रा.पं.सदस्य व महिला सदस्या वर्ग यांसह रमाकांत पाटील,बबन वारगुडे,अवधूत मातेरे, समीर म्हस्के आदिंसह खारी - खारगाव हद्दीतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते...

छायाचित्र :- केशव म्हस्के (खारी/रोहा)

Comments

Popular posts from this blog