धामणसई पंचक्रोशीतील जेष्ठ वारकरी गुरुवर्य ह.भ.प.सखाराम महाराज निकम (भाऊ महाराज) पंचतत्वात विलीन...
खारी-रोहा,दि.१६(केशव म्हस्के)
रोहे तालुक्यातील धामणसई गावचे सोनगाव - गावठाण धामणसई पंचक्रोशीतील जेष्ठ वारकरी ऋषितुल्य व्यक्तिमत्व तथा गुरूवर्य ह.भ.प.सखाराम महाराज निकम (भाऊ महाराज) यांना बुध.दि.१५ नोव्हे.रोजी राहत्या घरी अल्पशा आजाराने वयाच्या ९० व्या वर्षी देवाज्ञा वैकुंठवास...
वै.गुरूवर्य अलिबागकर बाबा यांच्याकडून वारकरी संप्रदायाची दीक्षा घेऊन भाऊ महाराजांनी धामणसई पंचक्रोशीत वारकरी संप्रदायाची मुहूर्तमेढ रोवली.आणि आज पंचक्रोशीत सांप्रदायाचे विशाल वटवृक्षात रूपांतर झाले आहे.भाऊ महाराजांनी आपल्या आयुष्यात सर्वच गोष्टींचा त्याग करून परमार्थ करून समाजप्रबोधनाचे मोठे कार्य केले.त्यांच्या वैकुंठ गमनाने धामणसई पंचक्रोशी पोरकी झाली असून सांप्रदायामध्ये कधीही न भरून येणारी पोकळी निर्माण झाली असल्याची भावना समाजमनातून व्यक्त होऊ लागली आहे.त्यांचे अंत्यदर्शन घेण्यासाठी आलेल्या सर्व भाविकांना शोक अनावर झाला होता.तर ज्ञानोबा-तुकाराम व विठ्ठल नामाच्या गजरात त्यांची अंत्ययात्रा काढून अत्यंत शोकाकुल वातावरणात भाऊंचे अंत्यविधी धामणसई येथील स्मशानभूमीत पार पाडण्यात आले.
त्यांच्या पश्चात पत्नी,चार मुले,दोन मुली, सुना, जावई,नातवंडे, पतवंडे असा परिवार असून त्यांचे दशक्रियाविधी शुक्र.दि.२४ नोव्हें.रोजी तर अंतिम धार्मिक विधी रवि.दि.२६ नोव्हें.रोजी राहत्या निवासस्थानी होणार असल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तीयांकडून देण्यात आली आहे.
Comments
Post a Comment