तळा तालुक्यातील शेतकरयांची दिवाळी अंधारातच - कैलास पायगुडे
तळा प्रतिनिधी - कृष्णा भोसले.
तळा तालुक्यातील शेतकरयानां यावर्षी आंबा काजु पिकविमा नोव्हेंबर महिना संपत आला तरी मिळाले नाही. एकमेव पिक घेत असलेला हा तालुका आजही या अनुदानापासून वंचित आहे. त्यामुळे शेतकरयांची दिवाळी अंधारात गेली असे म्हणायला हरकत नाही. असे आमच्या प्रतिनिधी जवळ बोलताना सामाजिक कार्यकर्ते कैलास पायगुडे यांनी सांगितले.
देशात राज्यात शेतकरी बांधवाना पिक विमा मिळाला त्यांच्या घरी दिवाळी झाली माझ्या तळा तालुक्यातील गरीब डोंगरकपारीत राहतो.त्याला मात्र दिवाळीच्या सणात हे पिक विम्याचे पैसे पदरी पडले नाहीत. त्यामुळे शेतकरी वर्ग खुप नाराज झाला आहे. अशा या तालुक्यात कृषी, महसूल विभागाचे अधिकारी यांचा पाठपुरावा करतात की नाही असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
अनेक जिल्ह्यातील आंबा काजु बागायती शेतकरयानां शेतकरी हप्ता हा कमी आहे. परंतु इथे जास्त विमा हप्ता असुनही शेतकरी वेळेत भरतात मग आमचे पैसे परत मिळायला मुदत असते की नसते असा प्रश्न त्यांनी केला आहे. यावर्षी चा हप्ता भरण्यासाठी ३० नोव्हेंबर ही शेवटची तारीख आहे. शेतकरी बांधवाना पैसे न मिळाल्याने ते पुन्हा पैसे भरण्यासाठी पुढे धजावत नाही. असेही शेवटी त्यांनी सांगितले.
Comments
Post a Comment