मुंबई विद्यापीठ आंतरमहाविद्यालयीन कुस्ती स्पर्धेत द. ग. तटकरे कला व वाणिज्य महाविद्यालय तळा, ला दोन सुवर्ण पदके आणि तीन रौप्य पदके प्राप्त


तळा  प्रतिनिधी कृष्णा भोसले.


               मुंबई विद्यापीठ आंतरमहाविद्यालयीन कुस्ती स्पर्धा दिनांक 8/11/2023 रोजी J.S.M महाविद्यालय अलिबाग येथे आयोजित करण्यात आल्या होत्या. या कुस्ती स्पर्धेमध्ये द.ग.तटकरे महाविद्यालयाने 2 सुवर्ण पदके आणि 3 रौप्य पदके प्राप्त केली. तसेच 4 खेळाडूंची मुंबई विद्यापीठ आंतरविभागीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड करण्यात आली. या स्पर्धेमध्ये द.ग.तटकरे महाविद्यालयातील कु. हिमांशू यादव ( FYBA ) 61 किलो वजनीगट आणि कु. साहिल चोरगे ( SYBcom) 79 किलो वजनीगटातुन सुवर्णपदके मिळविले. तसेच कु. सुनील मल्लाह ( TYBcom ) 61 किलो वजनीगट , कु. अशिष तळेकर ( SYBA ) 74 किलो वजनीगट आणि कु. अनिकेत यादव (SYBcom) 83 किलो वजनीगटातून यांनी रौप्य पदके मिळविले तसेच यातील 4 खेळाडूंची कु. हिमांशू यादव , कु. सुनील मल्लाह , कु. साहिल चोरगे, कु. अनिकेत यादव यांची मुंबई विद्यापीठ आंतरविभागीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

या विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष मा. चंद्रकांत रोडे, संस्थेचे सचिव मा. मंगेश देशमुख, महाविद्यालय विकास समितीचे चेअरमन डॉ. श्रीनिवास वेदक, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नानासाहेब यादव यांनी अभिनंदन केले. 

क्रीडा विभाग प्रमुख प्रा. भरत चाळके यांनी उत्तम कामगिरी बजावली याबद्दल त्यांचेही अभिनंदन करण्यात आले.

तसेच महाविद्यालयाचे प्राध्यापक वर्ग आणि कर्मचारी वर्ग यांनी देखील शुभेच्छा देऊन अभिनंदन केले.

Comments

Popular posts from this blog