रोह्यात मराठा आरक्षण उपोषणाला उत्स्फूर्त प्रतिसाद 


रोहा -शरद जाधव गेली अनेक वर्ष सातत्याने आम्हाला हक्काचा आरक्षण द्या म्हणत मराठा समाज शासन  दरबारी लढत असताना ढिम्म सरकार लक्ष देत नसल्याने लढवय्या मराठा मनोज जरांगे पाटील यांनी अखेर उपोषणाचे हत्यार उपसत लडो या मरो भूमिका घेत शासनाला चांगलेच धारेवर धरले आहे.

 मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ रोह्यात सकळ मराठा समाजाने शासनाचे लक्ष वेधण्याकरता तीन दिवस साखळी उपोषणाचे हत्यार उपसले आहे.यास संपूर्ण रोहा तालुक्यातील  मराठा बांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. नगरपालिकेच्या समोर एक भव्य स्टेज उभे करून कार्यकर्ते उपोषण बसलेले आहेत या ठिकाणी समाज प्रबोधनात्मक गिते व भाषणे सुद्धा होत आहेत. रोहा तालुक्यात सुद्धा मराठा समाज मोठ्या संख्येने आहे. विविध पक्षात सामाजिक संघटनेत गावोगावी ताकदीचे नेते आहेत. त्या सर्व नेत्यांनी आज समाजातील भावी पिढीच्या भविष्यासाठी आरक्षणात भाग घेतला आहे.सदर मराठा आरक्षण साखळी उपोषणास समाज नेते व्ही टी देशमुख, सकळ मराठा समाज अध्यक्ष आप्पा देशमुख, विजयराव मोरे, विनोद पाशिलकर  समीर शेडगे, नितीन परब, राजेश काफरे, महेश सरदार, रत्नप्रभा काफरे, दशरथ साळवी, प्रशांत देशमुख, अमोल देशमुख, अमित उकडे, मयूर पायगुडे,शशिकांत मोरे, सूर्यकांत मोरे, समीक्षा बामणे, राजेंद्र जाधव, निलेश शिर्के असे विविध पदाधिकारी साखळी उपोषण या ठिकाणी जातीने हजर आहेत. 

आरक्षण आमचा हक्क आहे आणि तो  आम्हाला मिळालाच पाहिजे. तो जर मिळाला नाही तर एक मराठा लाख मराठा याप्रमाणे मराठा पेटून उठेल असा इशारा मराठा समाजाचे युवा नेते  दशरथ साळवी यांनी सरकारला दिला आहे.

Comments

Popular posts from this blog