भातसई ग्रामपंचायतीचा धक्कादायक निकाल ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकला 

हवा शिंदे गटाची विजय मात्र राष्ट्रवादीचा. शेकाप-राष्ट्रवादी कार्यकर्त्यांची राजकीय खेळी पावरफुल ठरल्याची चर्चा  

रोहा - (शरद जाधव)

      रोहा तालुक्यातील बारा ग्रामपंचायत निवडणुकाचा निकाल 6 नोव्हेंबर रोजी लागला. यामध्ये संमिश्र निकाल प्राप्त झाला.  बहुचर्चित व सर्वांचे लक्ष लागून असलेल्या भातसई ग्रामपंचायत मध्ये चर्चा व हवा शिंदे गटाची होती. मात्र विजय राष्ट्रवादीचा झाल्याने राष्ट्रवादी पक्षाने या ठिकाणी विजयाचा जल्लोष साजरा केला. 

        भातसई ग्रामपंचायत मध्ये झोळांबे, लक्ष्मीनगर, वरवडे, व पाले, या गावचा समावेश आहे. या ग्रामपंचायत मध्ये जवळपास 2400 मतदान आहे. पूर्वीपासून प्रभाकर पाटील, दत्ता पाटील यांच्या काळापासून या ग्रामपंचायतींमधे शेतकरी कामगार पक्षाचे वर्चस्व आहे. मात्र पाटलांची पुढची पिढी कमी पडली आता नवीन पिढी पुढे आल्याने  राजकारण बदलले .निवडणुकीच्या सहा महिन्यापूर्वीच भातसई गावच्या विद्यमान सरपंचाने आमदार महेंद्र दळवी यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना शिंदे गटात प्रवेश केल्याने शिवसेनेच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या.

         या ग्रामपंचायतीचे सरपंच पदाकरता तिरंगी लढत होती. राष्ट्रवादीकडून योगिता पारधी,शेकापकडून मंगल पवार, शिवसेनेकडून अनिता पवार हे उमेदवार उभे होते. भातसई वार्डातून शिवसेना गटाकडून तरुण वर्गांना सदस्य पदाकरता संधी देण्यात आली होती. त्यांच्या विरोधात शेकापने उमेदवार उभे केले परंतु या वार्डात राष्ट्रवादीने उमेदवार उभे न करता नेहमीच राजकारणात पुढे असणारे निवास गावात मात्र निवांत राहिले .सरपंच पदाचा प्रचार करू लागले व भातसई गावातून एक मत राष्ट्रवादी सरपंचांना द्या असा प्रचार राष्ट्रवादीने सुरू केला होता. अगदी निवडणुकीच्या सुरुवातीपासून शिवसेना शिंदे गटाचा बोलबाला शेकापच्या लक्षात आल्याने जर या ठिकाणी शिंदे गटाचा सरपंच निवडून आला तर यांच्या नावात जरी धीर असला तरी हे शांत बसतील असे नाही हे लक्षात येताच शेकापने राष्ट्रवादीचे सरपंच योगिता पारधी यांना मत दिल्याचे दिसून येत आहे कारण शेकाप  सरपंच यांना खुप कमी मतदान झाले आहे .

       भातसई  ग्रामपंचायत मध्ये राष्ट्रवादी पक्षाचे बऱ्यापैकी प्राबल्य  असल्याने गावातील शेकाप फुटीचा फायदा आपल्याला होईल हे राष्ट्रवादीला माहिती असल्याने राष्ट्रवादीने प्रचार मोहिम यशस्वी राबवली व अगदी शेवटच्या रात्री शेकाप व राष्ट्रवादी च्या कार्यकर्त्यांचा पॉवरफुल गेम सक्सेस झाल्याची चर्चा आहे. राजकारणात गेले कित्येक वर्ष जुने जाणते बुजुर्ग मंडळी आहेत आणि त्यांनी दिवस काढले आहेत त्यांना अनुभव आहे, परंतु तरुण रक्त कोणाचे ऐकत नाही त्यामुळे  बेभान झालेल्या तरुणाईला आवरण्याचे काम भातसई ग्रामपंचायत मध्ये झाल्याची  चर्चा ऐकावयास मिळाली. तर योगिता पारधी या उच्चशिक्षित असल्याने मतदारांनी त्यांना कौल दिल्याची चर्चा आहे.

           भातसई ग्रामपंचायत आमदार अनिकेत तटकरे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी पक्षाचा झेंडा फडकला व एक हाती सत्ता आली.त्यामुळे आता विकासच्या बाबतीत मात्र मागे वळून पाहण्याची  वेळ येणार नाही. भातसई ग्रामपंचायतीचा विकास खासदार सुनीलजी तटकरे,मंत्री आदिती तटकरे,आमदार अनिकेत तटकरे यांच्या माध्यमातून न भूतो ना भविष्यती  होणार असल्याचे ज्येष्ठ कार्यकर्ते गजानन खांडेकर यांनी सांगितले यावेळी विजयी उमेदवार सरपंच योगिता नामदेव पारधी या भगिनीचे आमदार अनिकेत तटकरे यांनी अभिनंदन केले.

Comments

Popular posts from this blog