म्हसळ्यात 12 पैकी 10 ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा

नेवरूळ व भेकऱ्याचा कोंड ग्रामपंचायतीत ग्रामविकास आघाडी

विरोधी पक्षांवर राष्ट्रवादीचा एकतर्फी दबदबा



म्हसळा तालुका ग्रामपंचायत निवडणुकीत खासदार सुनिल तटकरे यांच्या विकास कामांना जनतेचा कौल


म्हसळा - श्रीकांत बिरवाडकर


     म्हसळा तालुक्यात 12 ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकित ग्रामपंचायत मधील नागरिकांनी खासदार सुनिल तटकरे, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे आणि आमदार अनिकेत तटकरे यांच्या विकास कामांना प्राधान्य देत त्यांचे हात मजबुत केले आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकित म्हसळा तालुका राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी कायम राहिली असल्याने हि लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीची नांदी असल्याचे बोलले जात आहे.12 पैकी बिनविरोध निवडून आलेल्या 7 ग्रामपंचायतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व होते तर दोन ठिकाणी ग्रामविकास आघाडीचे सरपंच बिनविरोध निवडून आले आहेत. तर 5 नोव्हेंबर रोजी झालेल्या मतदानातून व 6 नोव्हेंबर रोजी जाहीर झालेल्या निकालाचे मतपेटीतून ज्या तीन ग्रामपंचायत मधे निवडणूक लागली होती त्या तीनही ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे सरपंच व सदस्य निवडून आले असल्याने 12 ग्रामपंचायत पैकी 10 ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादी काँग्रेसने वर्चस्व प्रस्थापित करून निर्विवाद यश मिळविले असल्याने सद्यस्थितीत 10 ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा फडकविला आहे तर नेवरूळ व भेकऱ्याचा कोंड या दोन ग्रामपंचायतींच्या सत्तेची किल्ली ग्रामविकास आघाडी कडे राहिल्या आहेत. या दोन ग्रामपंचायतिचे सरपंच ग्रामविकास आघाडीचे आहेत असे सांगण्यात आले आहे. 

    म्हसळा तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीत घवघवीत यश मिळवले असल्याने खासदार सुनिल तटकरे यांच्या विकास कामांच्या बाजूने जनतेचा कौल असल्याचे दिसून येत आहे.

   म्हसळा तालुक्यातील 12 ग्रामपंचायतीचे सार्वत्रिक निवडणुकित नेवरुळ, घूम, जांभुळ, सालविंडे, वरवठणे, वारळ, भेकऱ्याचा कोंड, कुडगाव, पांगलोळी, कोलवट, ठाकरोली, आडी महाड खाडी या 12 ग्राम पंचायतीमध्ये निवडणुकीची रणधुमाळी सुरु होती. 12 ग्रामपंचायतीपैकी नेवरुल, घूम, ठाकरोली, जांभुळ, आडी महाड खाडी, कुडगाव, साळवींडे या सात ग्राम पंचायतीच्या निवडणूका बिनविरोध झाल्या होत्या तर पांगलोली ग्राम पंचायतीमध्ये सरपंच आणि अन्य सहा सदस्यांची निवड बिनविरोध झाली होती.

  भेकऱ्याचा कोंड येथे ग्रामविकास आघाडीचे मोहन शिंदे हे सरपंचपदी बिनविरोध निवडून आले आहेत. तर ग्रामपंचायत नेवरूळ येथे सरपंच सौ.श्वेता विनोद लटके सरपंच पदी आणि अन्य ग्रामपंचायत सदस्य हे ग्रामविकास आघाडीच्या माध्यमातूनच बिनविरोध निवडून आलेले आहेत असे नेवरूळ गाव अध्यक्ष श्री.अनिल लटके व नवनिर्वाचित ग्राप सदस्य अभिषेक कासार यांनी माहिती देताना सांगितले आहे.

 राष्ट्रवादीचे बिनविरोध निवडून आलेले सरपंच

1) घुम - सरपंच सौ.साक्षी सतिश घोले, 

2) जांभुळ - सरपंच श्री.किरण गणपत मोरे, 

3) कुडगाव - सरपंच श्री.संतोष गणपत रटाटे,

4) आडी महाड खाडी - सरपंच सौ.सलोनी सचिन खोपकर

5) सालविंडे - सरपंच श्री.उद्देश सखाराम पारदुळे 

6) ठाकरोळी - सरपंच सौ.श्वेता रमेश जाधव

7) पांगलोली -सरपंच सौ.बेबी संतोष कांबळे 

वरीलप्रमाणे सात सरपंचांची बिनविरोध निवड झाली होती. 

8) नेवरूळ - सरपंच सौ.श्वेता विनोद लटके - ग्रामविकास आघाडी

9) भेकऱ्याचा कोंड - सरपंच श्री.मोहन शिंदे - ग्रामविकास आघाडी


 निवडणूक लागलेल्या ग्रामपंचायती व नवनियुक्त सरपंच

10) वारळ - सरपंच सौ.कविता महेंद्र पेरवी - राष्ट्रवादी

11) कोळवट - सरपंच सौ.सुवर्णा सुनिल येलवे - राष्ट्रवादी

12) वरवठणे - सरपंच श्री.जयदास जानू भायदे - राष्ट्रवादी

        निवडणूक लागलेल्या वारळ, कोळवट आणि वरवठणे येथे राष्ट्रवादी काँग्रेसची थेट लढत शिवसेना उद्धव ठाकरे पक्षा बरोबर झाली होती.

      राष्ट्रवादीच्या बिनविरोध निवडून आलेल्या सरपंच आणि सदस्य यांचा खासदार सुनिल तटकरे, मंत्री आदिती तटकरे, आमदार अनिकेत तटकरे यांनी अभिनंदन केले असून राष्ट्रवादी पक्षाला घवघवीत यश प्राप्त करून देण्यासाठी आणि काही ठिकाणी निवडणूक बिनविरोध होण्यासाठी व ज्या ठिकाणी निवडणूक लागली होती त्या ग्रामपंचायत मधे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्वच कार्यकर्त्यांनी एकत्रित येऊन अथक परिश्रम घेतले असल्याने तटकरे कुटुंबियांनी सर्व कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले आहे.

Comments

Popular posts from this blog