महाराष्ट्र यादव चॅरिटी ट्रस्ट तळा शाखा अध्यक्ष पदी खेळु वाजे यांची फेर निवडतळा संजय रिकामे


महाराष्ट्र यादव चॅरिटी ट्रस्ट ही गवळी समाजाची शिखर संस्था असुन दी.८.१०.२३ रोजी वृंदावन येथे झालेल्या सर्वसाधारण सभेत तळा स्थानिक शाखा  कार्यकारणीची बिनविरोध निवड करण्यात आली. कासेवडी गावचे सुपुत्र अशोक लोखंडे विद्यामंदिर पीटसईचे चेअरमन सामाजिक कार्यकर्ते खेळु वाजे यांना अध्यक्षपदी पून्हा संधी देण्यात आली आहे.वाजे हे मन मिळावू शांत,स्वभाव,अभ्यासू व नेहमीच सहकार्याच्या भूमिकेत असल्याने त्यांची ट्रस्ट अध्यक्ष पदी फेर निवड झाल्याने सर्व स्तरातून त्यांचे अभिनदंन होत आहे.संपूर्ण गवळी समाजाला एकत्रित करण्याचे काम आम्ही करणार असून समाजाच्या वतीने समाज उपयोगी उपक्रम राबविण्यावर आमचा अधिक भर असणार आहे समाजाच्या समस्या सोडविण्या बरोबरच युवकांशी संपर्क साधून त्यांना समाजकार्यासाठी जोडण्यासाठी विविध कार्यक्रम घेण्यात येणार असल्याचे नव नियुक्त अध्यक्ष खेळु वाजे यांनी म्हटले आहे.                                                         

               ट्रस्ट कार्यकारणी बिनविरोध निवड करण्यासाठी सामूहिक निर्णय झाल्याने कार्यकारिणीची निवड बिनविरोध करण्यात आली.नवनियुक्त पदाधिकारी आणि सदस्य खालील प्रमाणे आहेत.१.खेळू वाजे अध्यक्ष (कासेवाडी)२.नामदेव तांबडे उपाध्यक्ष (वृंदावन)३.संजय रिकामे सरचिटणीस (वृंदावन)४.विठोबा धुमाळ सहचिटणीस (हनुमान नगर)५.प्रकाश घाटवळ खजिनदार (चरई गौळवाडी)६.दिलीप महाडिक सहखजिनदार(दहीवली)७.देवजी दर्गे सदस्य (कासेवाडी)८.अंकुश दर्गे सदस्य (रहाटाड)९.रामचंद्र धुमाळ सदस्य (हनुमान नगर)१०.चंद्रकांत तटकरे सदस्य (रोवळा)११.रामचंद्र तटकरे सदस्य (रोवळा)१२.कृष्णा महाडिक सदस्य (काकल)१३.कल्याणी वाजे सदस्य (चरई गौळवाडी )१४.दिलीप पाटील सदस्य (वृंदावन)१५.अंकुश पंदेरे सदस्य (दहिवली)१६.सदानंद तळकर सदस्य ( गौळवाडी)१७.अभिषेक महाडिकसदस्य (गौळवाडी)१८.जयश्री खेडेकर सदस्य (रहाटाड)१९.संतोष ठसाळ सदस्य (बोरीचामाळ) २०.हरिश्चंद्र दळवी सदस्य (चरई खुर्द) असा पदभार देण्यात आला आहे.अध्यक्ष खेळू वाजे पदाधिकारी, सदस्य यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Comments

Popular posts from this blog