पीएम किसान ई केवायसी पूर्ण करण्यासाठी मुदतवाढ



 १० ऑक्टोबर पर्यंत ई केवायसी पूर्ण करण्याच्या केंद्र शासनाच्या सूचना



तळा कृष्णा भोसले

                  प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजने अंतर्गत दरवर्षी शेतकऱ्यांना सहा हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. व राज्यशासन सुद्धा याच  योजनेतील पात्र  लाभार्थीना सहा हजार रुपयांची वाढीव आर्थिक मदत देणार आहे परंतु तालुक्यातील बऱ्याच पात्र  लाभार्थ्यांचे ई केवायसी प्रमाणिकरण, बँक खाते आधार सलग्न करणे व भुमिअभिलेख नोंदी अदयावत करणे प्रलंबित आहेत या बाबी केंद्र शासनाने पूर्ण करणे अनिवार्य केल्या आहेत. या अगोदर  शासनाच्या सुचनेनुसार जे लाभार्थी दि.१ ऑक्टोबर पर्यंत ई-केवायसी प्रक्रिया पुर्ण करनार नाहीत तसेच बँक खाते आधार संलग्न करणार नाही त्यांची नावे पीएम किसान योजनेतुन वगळण्यात येणार आसल्याच्या सूचना कृषी विभागास प्राप्त झाल्या होत्या परंतु केंद्र शासनाच्या सुधारित सूचना नुसार १० ऑक्टोबर पर्यंत ई केवायसी पूर्ण करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे .त्यामुळे प्रलंबित शेतकऱ्यांना  ई केवायसी पूर्ण करण्याची संधी मिळाली आहे  परंतु सदर मुद्दत संपल्यावरती पीएम किसान योजनेतुन नावे वगळण्यात येणार आहेत त्यामुळे शेतकऱ्यांना सदर दिनांकाच्या अगोदर ई केवायसी प्रमाणिकरण, बँक खाते आधार सलग्न करण्या विषयी आवाहन करण्यात येत आहे  तळा तालुका कृषी अधिकारी आनंद कांबळे यांनी यासंदर्भात प्रसिद्धी पत्रक दिले असून त्यात तालुक्यातील 147 लाभार्थींची ई -केवायसी तर 845 लाभार्थींची आधार सिडिंग प्रलंबित असल्याचे म्हटले आहे.मागील मे महिन्यापासून ते आजपर्यंत या संदर्भात गावस्तरावर लाभार्थी शेतकऱ्यांना वारंवार आवाहन करूनही केवायसी अपडेट होत नसल्याचे निदर्शनास आले आहे. 


केंद्र शासनाच्या सुधारित सूचना नुसार १० ऑक्टोबर पर्यंत  ही केवायसी व आधार अपडेट करण्याची शेवटची मुदत आहे.त्यानंतर  प्रधानमंत्री किसान योजनेच्या पोर्टलवरून लाभार्थी सूचीतून अशा लाभार्थींची नावे वगळली जातील व योजनेच्या लाभापासून वंचित राहण्यास संबंधित खातेदार शेतकरी स्वतः जबाबदार राहतील असे श्री.आनंद कांबळे यांनी म्हटले आहे.ई केवायसी अपडेट करण्याकरीता मोबाईल फोनवरुन ओटीपी बेस, सामाईक सुविधा केंद्र (CSC) मार्फत व मोबाईल फोन वरुन पी एम किसान गुगल ॲपव्दारे चेहरा पडताळणी / प्रमाणिकरण (Face Authentication) हे तीन पर्याय आहे.

बँक खाते आधार सलग्न करण्याकरीता ईंडीया पोस्ट पेमेंट बँक (IPPB) खाते उघडणे, स्वताचे बँक खाते आधार सलग्न करणे या बाबींचा वापर करुन पी एम किसान योजनेचा लाभ घेता येईल. केवायसी प्रलंबित लाभार्थ्यांची नावे ग्रामपंचायत, संबंधित गावचे कृषि सहाय्यक यांचेकडे उपलब्ध आहे.शेतकऱ्यांना ई- केवायसी व बँक खाते आधार सलग्न करण्यासाठी काही अडचण असल्यास आपल्या गावातील कृषी सहाय्यक किंवा कृषी विभाग यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन आनंद कांबळे यांनी केले आहे.

"पी. एम किसान योजने अंतर्गत ई- केवायसी व बँक खाते आधार संलग्नीकरण (NPCI) १०  ऑक्टोबर पर्यंत करण्यात यावे. नाहीतर लाभार्थींची नावे रद्द करण्याची कार्यवाही शासन स्तरावरून केली जाईल याची सर्व शेतकरी बंधूंनी नोंद घ्यावी." - आनंद कांबळे (तालुका कृषि अधिकारी, तळा)

Comments

Popular posts from this blog