तळा तालुक्यातील ६ ग्रामपंचायतीसाठी सत्ता संघर्ष
महविकास, महायुती बाजूला पडणार
तळा संजय रिकामे
तळा तालुक्यात भानंग,तळेगाव,चरई खुर्द, निगुडशेत, मांदाड,गिरणे या सहा ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत असून, यावेळेस स्थानिक पातळीवर राष्ट्रवादी काँग्रेस, शिंदे गट भाजपच्या गटातच लढती होणार आहेत. त्यामुळे आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीत वर्चस्व राखण्यासाठी या ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शिंदे गट व भाजपच्या नेत्यांनीही लक्ष घातल्यामुळे या तीन पक्षातच सत्ता संघर्ष रंगणार आहे.तळा तालुका राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असूनही मागील राहटाड आणि काकडशेत ग्रामपंचायत थेट सरपंच पदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराला पराभवाचा सामना करावा लागला होता नंतर याच सरपंचांचा पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश करून त्यांनी आपले बाले किल्ले शाबूत ठेवले.शिंदे गट आणि भाजपा यांची तळा शहरात वर्चस्व असुन या दोन पक्षांना ग्रामीण भागात आपली ताकद वाढविण्याच्या दृष्टिकोनातून काम सुरू केले आहे.त्यामुळे यावेळेस आता शिंदे गट आणि भाजपने सर्व निवडणुकांत लक्ष घालण्याची तयारी केली आहे.
आ.अनिकेत तटकरे यांनी सहा ग्रामपंचायतीवर थेट सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यपदी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार निवडून आण्यासाठी प्लॅनिंग केले आहे शिंदे गट भाजप देखील प्रयत्नात असून काही ठिकाणी उद्धव गट देखील सक्रिय झाला असल्याचे पाहायला मिळत आहे.या निवडणुकांत एकमेकांना अडविण्यासाठी प्रयत्न होणार आहेत. त्यासाठी त्यांना उद्धव ठाकरे शिवसेना व शेकाप यांची मदत घ्यावी लागणार आहे त्यामुळे ग्रामपंचायत निवडणुकीत स्थानिक पातळीवर गटाच्या माध्यमातून पॅनेल टाकली जाणार आहेत.सर्व पक्षांनी थेट सरपंच पदासाठी लक्ष केंद्रित केले आहे.भानंग येथे राष्ट्रवादी,शिंदे गट, उद्धव गट असा तिरंगी सामना रंगणार आहे तर तळेगाव आणि मांदाड येथे राष्ट्रवादी, शिंदे गट भाजपा सामना रंगणार आहे चरई खुर्द येथे राष्ट्रवादी विरुद्ध शेकाप निगुडशेत येथे राष्ट्रवादी विरुद्ध शिंदे गट . गिरणे येथे राष्ट्रवादी विरुद्ध शिंदे गट अशा लढती होणार आहेत.जास्तीतजास्त ग्रामपंचायतींवर सत्ता मिळविण्यासाठी राष्ट्रवादी शिंदे गट भाजपमध्येच संघर्ष होणार आहे. परिणामी जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकांचा पाया भक्कम करण्याची तयारी या तीन पक्षांकडून होणार आहे.
Comments
Post a Comment