कोकण मराठी साहित्य परिषद रोहा शाखेच्या अध्यक्षा सौ.संध्या विजय दिवकर या नारीशक्ती पुरस्काराने सन्मानित 


रोहा प्रतिनिधी 

दि. १९ ऑक्टोबर २०२३ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व सुनील तटकरे युवा प्रतिष्ठान तर्फे साहित्यासाठीचा नारीशक्ती पुरस्कार सौ . संध्या विजय दिवकर यांना   समाज व बालकल्याण मंत्री, ना. आदितीताई सुनील तटकरे व आ . अनिकेतभाई सुनील तटकरे यांच्या हस्ते देण्यात आला . 


समाजातील छोट्या छोट्या संस्थांतून होत असलेले समाजोपयोगी कार्य, आपल्या तीक्ष्ण नजरेने टिपून त्या त्या व्यक्तींचा सन्मान करून त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप देऊन प्रेरीत करण्याचे बहुमोल काम तटकरे कुटुंबिय नेहमीच सातत्याने करत आहेत .



 सौ संध्या विजय दिवकर या पेशाने प्रा. शिक्षिका असून त्यांचे मूळगाव यशवंतखार आहे .सध्या त्या गायत्रीनगर - भुवनेश्वर, रोहा येथे रहात आहेत . सन- १९८९ पासून जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षका, सन- २००६ पासून रोहा नगर पालिकेच्या शाळेत त्या शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. 

सुमारे ४२ वर्षांनंतर मागील पंचवार्षिक मध्ये प्राथमिक शिक्षक पतपेढी रोहाच्या प्रथम महिला चेअरमन म्हणून सुद्धा त्याना बहुमान मिळाला होता.

 त्या स्वतः वाचन, लेखन,गायन, सूत्रसंचालन ,चित्रकला, रांगोळी, कविता , चारोळी करणे इ. छंद जोपासतात. सौ.संध्या विजय दिवकर या उत्कृष्ट *कवयित्री व गजलकार* असून त्यांच्या  अनेक आगरी कविता प्रसिद्ध आहेत. त्यांची इवान ✈️ ही कविता युट्युब वर आहे . ती अखंड महाराष्ट्रात चांगलीच गाजली .



सौ .संध्या दिवकर या कोकण मराठी साहित्य परीषद शाखा रोहाच्या विद्यमान अध्यक्षा आहेत.  आपल्या देखरेखीखाली सौ संध्या दिवकर यांनी कोमसाप रोहा शाखेतर्फे वर्षभरात अनेक उपक्रम  राबविले . 

तालुक्यातील उभरत्या कवी, लेखकांसाठी हक्काचं व्यासपीठ देण्यासाठी ही शाखा सातत्याने प्रयत्न करीत असते . शाखा वर्षभरात खेडयापाड्यातील विविध शाळां - कॉलेजमध्ये जावून सातत्याने व्याख्यानांचे व कवीसंमेलन यांचे आयोजन करीत असते. तसेच निबंध स्पर्धा, काव्यलेखन स्पर्धा, कथाकथन इ उपक्रम शाखेद्वारे राबविण्यात आले.

 त्या स्वतः सातत्याने तालुका, जिल्हा व राज्यस्तरीय कवीसंमेलात सहभाग घेतात .

त्यांना कविता लेखन व वाचनाचे अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत. 

 त्यांचे

प्राप्त पुरस्कार...

१) आदर्श गृहिणी  .२००३

२) रोहा आयडॉल.  २००६

३) आदर्श शिक्षिका.. २००७

४) उत्कृष्ट कवयित्री २०१५

५) शि.ज्यो.शा.बा. पुरस्कार .. माथेरान -गिरीस्थान नगरपरिषद.. २०१८

तसेच अनेक दिवाळी अंकात ललित लेखन व कविता लेखन त्या सातत्याने करत असतात . 

त्यांचा रंग मना मनाचे , हा प्रतिनिधीक कविता संग्रह प्रकाशित झालेला आहे.

आगामी कविता संग्रह लवकरच येत आहे .

त्यांच्या कार्याचा सर्वत्रच गौरव होत आहे.

नारीशक्ती पुरस्कार देवून योग्य व्यक्तीची निवड करण्यात आल्या बद्दलची चर्चा सगळीकडे ऐकावयास मिळत आहे . सर्व क्षेत्रातून त्यांचे अभिनंदन होत आहे 

रायगड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष मा. श्री मधुशेठ पाटील, तालुका अध्यक्ष श्री विनोदभाऊ पाशिलकर, वरसे ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच मा. श्री नरेशजी  पाटील, उपसरपंच शांतीशील तांबे व सर्व सदस्य . तसेच ग्रुपग्राम पंचायत सानेगाव -यशवंतखारच्या सरपंच सौ. गीताताई भोईर व सर्व सदस्य , तसेच भुवनेश्वर, आदर्श नगर , एकतानगर तसेच यशवंतखार - मुंबई ग्रामस्थ मंडळ, तसेच कोकण मराठी साहित्य परिषद रायगड जिल्हा अध्यक्ष श्री सुधीरभाई शेठ,श्री एल.बी.पाटील सर, श्री संजयजी गुंजाळ, गडकिल्ले अभ्यासक, सुखद राणे, सर्व तालुका अध्यक्ष कवी बंधू भगिनी , अखिल आगरी साहित्य संस्था. तसेच फेडरेशनचे अध्यक्ष श्री हेमंतशेठ ठाकूर,रोहा, रोहा तालुका रहिवासी संघाचे अध्यक्ष श्री विजय दिवकर व सहकारी, नगरपरिषद प्रशासन अधिकारी श्री मधुकर सोनावणे साहेब, रोहा नगरपरिषदेचे सर्व नगरसेवक व नगरसेविका,सर्व शिक्षक  बंधू भगिनी यांच्याकडून त्यांना पुढील साहित्यीक कार्यासाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा देण्यात येत आहेत.

Comments

Popular posts from this blog