तळे विभाग शिक्षण प्रसारक मंडळाचा साखरचौथ गणपती उत्सव संपन्न



तळा-किशोर पितळे 

           तळे विभाग शिक्षण प्रसारक मंडळाचे बालविकास, प्राथमिक विद्यामंदिर,गो म वेदक विद्यामंदिर,पन्हेळी हायस्कूल,कला वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय, द ग तटकरे कला व वाणिज्य महाविद्यालय तळा या विद्याशाखेच्या वतीने साखरचौथ गणपती उत्सव२०२३ चे आयोजन करण्यात आले होते साखरचौथ गणपती उत्सवाचे हे दुसरे वर्ष होते.दिनांक १ ऑक्टोंबर २०२३ रोजी सकाळी १०.०० वाजता राधाकृष्ण मंदीरातून नगरपंचायत, बाजारपेठ, बळीचा नाका, मुळे हॉटेल ते तळे विभाग शिक्षण प्रसारक मंडळाचे विद्यासंकुल अशी डी जे च्या तालावर मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत संस्थापदाधिकारी,सर्व विद्याशाखेचे शिक्षक,शिक्षकेत्तर कर्मचारी, पालक व विद्यार्थी सहभागी झाले होते.दिनांक २ऑक्टोंबर २०२३ रोजी सकाळी ९.०० वाजता संस्थेचे सचिव मंगेश देशमुख सौ नेत्रा देशमुख यांच्या हस्ते गणपतीची विधिवत पूजा करण्यात आली यावेळी रोहित भागवत यांनी पौरोहित्य केले. सकाळी १० वाजता महात्मा गांधी व लाल बहाद्दूर शास्त्री जयंती आणि डॉ. सी डी देशमुख यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. सकाळी १०.३० वाजता इयत्ता ५ वी ते १२ वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या बुद्धीबळ व कॅरम स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धेचे उद्घाटन संस्थेचे विश्वस्त मारूती शिर्के यांच्या हस्ते करण्यात आले.सकाळी ११.०० ते १२.वा वेळेत प्राथमिक विद्यामंदिरच्या विद्यार्थ्यांच्या चित्रकला स्पर्धा पार पडल्या.दुपारी १२.३० वाजता तळे विभाग शिक्षण प्रसारक मंडळाचे पदाधिकारी, सर्व विद्याशाखेचे शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, पालक व विद्यार्थ्यांच्या हस्ते गणपतीची सामूहिक आरती घेण्यात आली. दुपारी १ ते २ या वेळेत भोजन, दुपारी २ ते ४ गणपती दर्शन व दुपारी ४ ते ६ या वेळेत सुहास भोईर, मयुरी साळवी व विद्यार्थ्यांनी भजन सादर केले.सायंकाळी ६ ते ९ या वेळेत सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले.                 

           बालविकास विद्यामंदिरच्या विद्यार्थ्यांनी माझ्या पप्पांनी गणपती आणला व एक तरी मोदक खा ना या गाण्यावर नृत्य सादर केले. प्राथमिक विद्यामंदिरच्या विद्यार्थ्यांनी चक चक सोन्याचा व देवा श्रीगणेशा यावर नृत्य सादर केले. गो म वेदक विद्यामंदिरच्या विद्यार्थ्यांनी माझ्या शाळेचा गणपती ही एकांकिका व मंगळागौरी नृत्य सादर केले. कला वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी मोरया रे बाप्पा मोरया यावर नृत्य सादर केले. द ग तटकरे कला वाणिज्य महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी कोकणातील लोकनृत्य सादर केले. तसेच कुंभारवाडा महिला मंडळांनी वर्षभरातील सर्व सण व उत्सवाचे महत्व व समर्थ नगरच्या महिला मंडळांनी मंगळागौरी सादर करून उपस्थितांची मने जिंकली.रात्री ८ वाजता बालविकास, प्राथमिक, माध्यमिक, कनिष्ठ महाविद्यालय व वरिष्ठ महाविद्यालयातील ज्या विद्यार्थ्यांनी तालुका, जिल्हा, विभाग स्तरावर कुस्ती, चेस, स्केटिंग, कॅरम  क्रीडास्पर्धा व चित्रकला स्पर्धेत उल्लेखनीय कार्य केलेल्या विद्यार्थ्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला.

          तळा नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा सौ माधुरी घोलप,नगरसेवक विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, वसंत पोळेकर आदी मान्यवरांचा यथोचित सत्कार करण्यात आला.रात्री ९  वाजता भोजन करण्यात आले. तर रात्री १० वाजता भजन सादर करण्यात आले.दिनांक ३ ऑक्टोंबर २०२३ रोजी सकाळी ९.३० वाजता कार्यकारी मंडळाचे सदस्य महादेव बैकर व सौ बैकर यांच्या हस्ते गणपतीची विधिवत पूजा करण्यात आली. सकाळी १० वाजता जय हनुमान प्रासादिक भजनी मंडळ खांबवलीच्या ग्रामस्थानी भजन सादर केले. दुपारी १२.३० वाजता गणपतींची सामुहिक आरती घेण्यात आली. दुपारी १.०० वाजता कर्नाळा ग्रामस्थानी आपली लोककला सादर केली. दुपारी ३.०० वाजता गणपतींची उत्तरपूजा करण्यात आली. दुपारी ४.०० ते सायंकाळी ६.०० या वेळेत तळे विभाग शिक्षण प्रसारक मंडळाचे सर्व पदाधिकारी, सर्व विद्याशाखेचे शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, पालक व विद्यार्थी यांच्या उपस्थितीत लेझिम व डी जे च्या तालावर तळे विभाग शिक्षण प्रसारक मंडळाचे संकुल, मुळे हॉटेलचे कॉर्नर, कासार आळी, कुंभार आळी या मार्गे भव्य अशी मिरवणूक काढून पुसाटी तलावात गणपतीचे विसर्जन करण्यात आले.

       साखरचौथ गणपती उत्सव २०२३ यशस्वी करण्यासाठी तळे विभाग शिक्षण प्रसारक मंडळाचे विश्वस्त श्री मारूती शिर्के, अध्यक्ष श्री चंद्रकांत रोडे, उपाध्यक्ष श्री पुरुषोत्तम मुळे, सचिव श्री मंगेश देशमुख, शाळा समितीचे चेअरमन श्री महेंद्र शेठ कजबजे, प्राथमिक विभागाचे चेअरमन श्री किरण देशमुख, पन्हेळी हायस्कूलचे चेअरमन श्री श्रीराम कजबजे, संस्थेचे पदाधिकारी महादेव बैकर, डॉ सतिश वडके, प्राचार्य डॉ नानासाहेब यादव, मुख्याध्यापक श्री दिलीप ढाकणे सर्व विद्याशाखेचे शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, पालक व विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले. हा उत्सव साजरा करण्यासाठी पोलिस प्रशासनाने विशेष सहकार्य केले त्याबद्दल त्यांचेही आभार मानण्यात आले.अशा धार्मिक सोहळ्याचे आयोजन करून सांगता झाली.

Comments

Popular posts from this blog